घरपालघरपशुसंवर्धन विभागाचा कारभार रामभरोसे

पशुसंवर्धन विभागाचा कारभार रामभरोसे

Subscribe

मोखाडा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने येथील कारभार म्हणजे आंधळ दळते अन कुत्रे पीठ खाते अशी परिस्थिती झाली आहे.

मोखाडा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने येथील कारभार म्हणजे आंधळ दळते अन कुत्रे पीठ खाते अशी परिस्थिती झाली आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी अजय कांबळे यांची तीन वर्षांपूर्वी बदली झाली आहे. त्यानंतर येथील पशुवैद्यकीय अधिकारीपदाचा कार्यभार प्रभारी पदावरच सुरु आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी रिक्त झालेल्या पदावर अद्याप कायमस्वरुपी अधिकारी नेमण्यात आलेला नाही. सध्या यापदाचा कार्यभार विनित गोंदके यांच्याकडे आहे. पण, त्यांच्याकडे अनेक ठिकाणच्या अतिरिक्त कार्यभार असल्याने ते मोखाड्यात फक्त मंगळवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस येतात. त्यामुळे येथील कार्यालयाचा कारभार विस्कळीत झाला आहे.

पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरात लवकर भरली जावीत यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. आता आमचे महाविकास आघाडीचे सरकार असल्याने रिक्तपदाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अशा आहे.
– सारिका निकम , सभापती (पंचायत समिती मोखाडा)

- Advertisement -

आदिवासींचे जीवनमान व आर्थिक स्थर उंचवावा यासाठी  या विभागात अनेक महत्वपूर्ण योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये अनुदानित संकरीत गाय व म्हैस वाटप योजना, अनुदानीत समृद्ध योजनेतून भांडी पुरवठा ,तसेच दुधाळ जनावरे, व दुभत्या जनावरांसाठी पशुखाद्य वाटप, वंध्यत्व निवारण शिबीरे आदी योजना या विभागाच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर गाई, म्हैस, शेळ्या यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हावी रोहयो अंतर्गत गोठयाची योजना राबवली जाते. परंतु येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने ह्या अनेक योजनांना ब्रेक लागला आहे. त्याचबरोबर खोडाळा, वाशाळा, मोखाडा व पंचायत समिती येथील पशुधन अधिकारी ही चारही पदे रिक्त आहेत. यासह अनेक पदे रिक्त आहेत. ती त्वरीत भरण्याची मागणी करण्यात येते.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरली जावीत यासाठी वरिष्ठांकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. ही पदे मंत्रालयातून भरली जातात. त्यामुळे विलंब होत आहे.
– रघुनाथ पांढरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोखाडा

- Advertisement -

हेही वाचा –

ऑनलाईन सुनावणी दरम्यान आरोपी न्यायाधीशाला असं काही बोलला की… तुम्हीही व्हाल हैराण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -