मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी, चौघांना वन विभागाकडून अटक

दरम्यान पोलीस कर्मचार्‍यांची माहिती उपलब्ध झाली नाही.मांडूळ तस्करीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असून तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

मनोर: वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी मांडूळ सापाची तस्करी करणार्‍या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
न्यायालयाकडून चारही आरोपींना शुक्रवारपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यात असलेल्या मांडूळ सापाचे वजन वाढवण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून प्लास्टिकच्या ड्रममध्ये ठेवण्यात आले होते. वनविभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात पोलीस दलातील कर्मचार्‍यांची नावे समोर आली आहेत.दरम्यान पोलीस कर्मचार्‍यांची माहिती उपलब्ध झाली नाही.मांडूळ तस्करीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असून तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

वनपाल अण्णासाहेब आव्हाड आणि वनरक्षक गौतम पवार यांना मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती.माहितीनुसार उपवनसंरक्षक मधुमिथा एस यांच्या मार्गदर्शनात शनिवारी (ता.04) सायंकाळी पालघरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश परिहार यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे.गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना वन कोठडी देण्यात आली आहे. मांडूळ तस्करीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश परिहार यांनी दिली. काळी जादू आणि पैसे पाडण्यासाठी ग्रामीण भागातील आदिवासींना पैशाचे अमिष दाखवून दुर्मिळ असलेले वन्य प्राणी आणि मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी केली जाते.