घरपालघरकोकणचा राजा हापूस गुजरातच्या वेशीवर उपलब्ध; डहाणूत शेतकरी आंबा महोत्सव

कोकणचा राजा हापूस गुजरातच्या वेशीवर उपलब्ध; डहाणूत शेतकरी आंबा महोत्सव

Subscribe

जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक उद्योजक निलेश सांबरे यांच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद रोड गुजरात बॉर्डर वर डहाणू येथे कोकणातील शेतकऱ्यांचा आंबा बाजारचा शुभारंभ झाला.

जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक उद्योजक निलेश सांबरे यांच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद रोड गुजरात बॉर्डर वर डहाणू येथे कोकणातील शेतकऱ्यांचा आंबा बाजारचा शुभारंभ झाला. याला स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, व मान्यवर व्यक्तिमत्वे आवर्जून उपस्थित होती. जिजाऊ संस्थेचे जावेद खान यांनी या कार्यक्रमाचा समन्वय केला. कोकणभूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकणचा उपक्रम असलेल्या आंबा महोत्सवाला पालघरमधील स्थानिक नागरिक तसेच गुजरातकडे जाणारे प्रवासी यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामुळे देवगड, विजयदुर्ग, पावस, रत्नागिरी येथील कोणतीही भेसळ नसलेला हापूस आंबा थेट आंबा प्रेमींना मिळण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि मान्यवर नागरिक यावेळी आवर्जून उपस्थित होते.
कोकणातील हापूस आंबा पेटी पिकल्यानंतर घरभर पसरणारा सुगंध, संपूर्ण जगाला मोहवणारी उत्कृष्ट आंबट-गोड चव, पातळ साल, आकर्षक केशरी रंग, एक वर्षा आड येणारे कमी उत्पन्न, राजा असल्यामुळे निसर्गाला खूप संवेदनशील, फळांची काढणी निगराणी, हाताळणी खूप परिश्रम पूर्वक करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक. म्हणूनच कोकणातील हापूस महाग असतो.
तर कर्नाटक आणि दक्षिण भारतातील डुप्लिकेट आंबा हा दिसायला हुबेहूब हापूससारखा असतो. फळे दिसायला बाहेरून पिवळी आणि आतून कापल्यानंतर सुद्धा पिवळा रंग, हापूसच्या तुलनेत अतिशय सुमार चव, जाड साल, भरपूर उत्पन्न येत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि त्यामुळे हापूसच्या निम्मा दर या आंब्यांचा असतो.
आता मुंबई-पुण्यात नाही तर परदेशातसुद्धा रत्नागिरी आणि देवगड हापूस म्हणून कर्नाटकचा हापूस विकला जातो. सर्वांना कोकणातील ओरिजनल हापूस आंबा थेट शेतकऱ्यांकडून मिळावा याकरता कोकणभूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकण संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात शेतकरी आंबा बाजार आणि विविध महोत्सव आयोजित करत आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,  ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या या उपक्रमाला सहकार्य मिळत आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -