घरपालघरमनोज जरांगे- पाटील पालघरमध्ये

मनोज जरांगे- पाटील पालघरमध्ये

Subscribe

दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी नेत्यांसह कुणबी सेनेच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच जरांगे-पाटील यांची तोफ घडाडणार असल्याने या सभेत जरांगे-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोईसर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे,अशी मागणी करून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यसरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून त्याआधी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.या दौर्‍याचाच एक भाग म्हणून जरांगे-पाटील पालघर जिल्ह्यात येणार असून बोईसरमध्ये मनोज जरांगे- पाटील यांची जाहीर सभा आज होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ४ वाजता बोईसरच्या सर्कस ग्राऊंड येथे मनोज जरांगे पाटील हे उपस्थितांना संबोधित करणार आहे. या सभेसाठी वसई , विरार , सफाळे, पालघर , डहाणू, मोखाडा , तलासरी , वाडा ,विक्रमगड ,जव्हार भागातून सकल मराठा समाजबांधवांना येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात अडीच ते तीन लाखांच्या संख्येने मराठा समाजाचे वास्तव्य आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील बहुतेक मराठा समाज अन्य जिल्ह्यातून स्थलांतरित झालेला आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी नेत्यांसह कुणबी सेनेच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच जरांगे-पाटील यांची तोफ घडाडणार असल्याने या सभेत जरांगे-पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisement -

सभेची तयारी

1) अडीच एकर जागेची साफसफाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

2) स्वयंसेवक म्हणून २००, महिला स्वयंसेवक ५०

3) वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बोईसर परिसरातील लोकांनी स्वतःची वाहने न आणण्याचे आवाहन.

4) मैदानात एका बाजूने तालुक्यातील वाहनांची सोय, बसस्थानक, दुसरी खोदराम बाग – डॉन बोस्कोकडे तर काही वाहने सिडको मंदिराकडे पार्कींग केली जातील.

बॉक्स

अन्य कोणालाही व्यासपीठावर प्रवेश नाही
या सभेत फक्त मनोज जरांगे-पाटील यांचेच मार्गदर्शनपर भाषण होणार असून भाषणासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपिठावर अन्य कोणालाही जाता येणार नसल्याने सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

कोट – प्रतिक्रिया – १)
आदिवासी आणि ओबीसींचा पालघर जिल्हा असल्याने मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे. सरकारने मराठ्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. परंतु ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कात बाटेकरू सहन केला जाणार नाही. जरांगे पाटलांनी पालघरमध्ये येऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीची भूमिका मांडल्यास भूमिकेचा विरोध केला जाईल.

– कुंदन संखे, प्रवक्ता, ओबीसी हक परिषद, पालघर,

प्रतिक्रिया 2

आमचे मूळ गाव सातारा असले तरी आम्ही १९८९ पासून बोईसर येथे स्थायिक झालो आहोत. आदिवासी समाज , ओबीसी समाज आम्ही एकत्र राहतोय.परंतु,यावेळी आरक्षण विषय असल्यामुळे जरांगे पाटील यांच्या सभेच्या आयोजनाची जय्यत तयारी चालू आहे.

– तेजस पवार, कार्यकर्ता

प्रतिक्रिया 3)
पालघर जिल्ह्यामध्ये वसई, विरार, नालासोपारा, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वाडा या तालुक्यांमध्ये मराठा समाजाची संख्या जवळपास अडीच ते तीन लाख आहे. सर्वजण सभेसाठी सज्ज झाले आहेत.

– संतोष मराठे ,ज्येष्ठ कार्यकर्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -