बोईसर: २४ डिसेंबरला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही .सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही . हा लढा पहिला आणि शेवटचा असून आरक्षणाला कुणी कितीही विरोध केला तरी आरक्षण मिळणारच असा पुनरूच्चार मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला. पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये मनोज जरांगे- पाटील यांच्या महाराष्ट्र दौर्यातील एक सभा पार पाडली.यावेळी जरांगे-पाटील बोलत होते. सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ०६ वाजता बोईसरच्या सर्कस ग्राऊंडमध्ये ही जाहीर सभा पार पडली .
यावेळी बोलताना, ओबीसी बांधव -मराठा बांधव समाज हे एकत्रच आहेत. गावागावात ग्रामीण भागात एकत्र आहेत,असे यावेळी जरांगे पाटील म्हणाले.तसेच आरक्षण मिळेपर्यंत १ डिसेंबर पासून ’ गांव तिथे साखळी’ उपोषण चालू करा. 24 डिसेंबरपर्यंत आपला कसोटी काळ आहे,असेही ते यावेळी म्हणाले.१९६७ पासूनच्या नोंदी सापडायला सुरूवात झाली आहे. समाजाला मायबाय मानलंय, समाजाशी गद्दारी करणार नाही.आरक्षण मिळाल्याशिवाय माघे हटणार नाही,असे वचन देखील यावेळी जरांगे यांनी उपस्थितांना दिले.सभेला संबोधताना ८५% लढाई जिंकली आहे. ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. कायद्याचे सर्व निकष पाळून शांततेच्या आमरण उपोषण चालू केले . राज्यात मराठा आंदोलक एकजूट ,प्रत्येक मुलाचे हित या मराठा आरक्षणात आहे .शांततेच्या मार्गाने आणलेली ही चळवळ आहे,असेही यावेळी जरांगे म्हणाले. यावेळी पालघर जिल्ह्यातील वसई , विरार , सफाळे, पालघर , डहाणू, मोखाडा , तलासरी ,वाडा ,विक्रमगड ,जव्हार भागातून सकल मराठा समाजबांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे यांना बोईसरमध्ये पुष्पहार घालण्यात आले. जरांगे पाटील सभास्थळी नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा दाखल झाले.हार तुर्यांचा सत्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.