घरपालघरमनोर पोलिसांनी प्राणी तस्करांच्या मुसक्या आवळल्या

मनोर पोलिसांनी प्राणी तस्करांच्या मुसक्या आवळल्या

Subscribe

पोलिसांच्या वाहनांना ठोकर मारून भरधाव वेगात गुंगारा देत पळून जाण्याचा यशस्वी ठरलेल्या गो-तस्करांच्या मुसक्या मनोर पोलिसांकडून आवळण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या वाहनांना ठोकर मारून भरधाव वेगात गुंगारा देत पळून जाण्याचा यशस्वी ठरलेल्या गो-तस्करांच्या मुसक्या मनोर पोलिसांकडून आवळण्यात आल्या आहेत. पाठलाग करून मनोर पोलिसांनी तीन गो-तस्करांना ताब्यात घेतले आहे. तसेच एक टन गोमांस जप्त केले आहे. रविवारी पहाटे सात वाजताच्या सुमारास मनोर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान जप्त केलेल्या गाडीमधून दोन जीवंत बैल आणि पीक अप टेम्पोमधून गोमांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मनोर-वाडा रस्त्यावरून गो-तस्करी होणार असल्याच्या गुप्त माहितीनुसार मनोर पोलिसांनी रविवारी पहाटे तीन वाजता मनोर-वाडा रस्त्यावरील टेन नाका येथे नाकाबंदी आणि सापळा रचला होता. सकाळी सात वाजताच्या सुमारास महामार्गावरून टेन नाक्याच्या दिशेने आलेल्या संशयास्पद वॅगनार कार आणि पीक अप टेम्पो चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला होता. परंतु कार चालकाने नाकाबंदीवरील पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून कार महामार्गावर वळवून गुजरातच्या दिशेने पळून गेला होता. तर पीकअप टेम्पो मनोर वाडा रस्त्याच्या दिशेने पळून गेला होता. कार विक्रमगडच्या दिशेने पळून जात होती. दरम्यान, पोलिसांकडून कारचा पाठलाग सुरू असताना विक्रमगड रस्त्यावरील भोपोली गावच्या हद्दीत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका घराच्या जोत्याला धडकल्याने कारचा अपघात झाला होता. भोपोली गावात अपघात झालेल्या कारचा चालक आणि इतर दोन आरोपींना ग्रामस्थांनी पकडून ठेवले होते. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या ताब्यात त्यांना देम्यात आले होते. यावेळी गुंगीत असलेल्या दोन जीवंत बैलांसह कार जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

मनोर वाडा रस्त्याच्या दिशेने पळून गेलेला पीक अप टेम्पो टेन गावात निर्जनस्थळी उभा करत अंधाराचा फायदा घेत तीन आरोपी पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. टेम्पोत गोमांस असल्याचे आढळून आले. गोमांसासह पीकअप टेम्पो जप्त करण्यात आला आहे. कारवाई पथकात मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अजित कणसे यांच्यासह मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी भाग घेतला होता. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, २७९, ३३७, ३०७, ३७९, ३३८, ४२९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा १९७६ चे कलम ६, ९, ११ महाराष्ट्र प्राणी रक्षणा (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५.५ (सी) ९, ९ (अ), ९ (बी) सह मोटार वाहन अधिनियम कलम १३९, १७७, १८४, १८७, १३४ (अ) (ब) ६६ (१) १९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात शब्बीर अहमद शगिर अहमद शेख (वय ५०, रा. दुसरा निजामपुर, मस्जिद खिजराच्या समोर, भिवंडी), शरीफ हनिफ कुरेशी (वय ३५, रा. तासा बावडी, खिजरा मस्जिद समोर, दुसरा निजामपुरा, भिवंडी) आणि तबरेज फारुख शेख (वय २२, रा. गायत्रीनगर पोलीस चौकीसमोर, शांतीनगर, भिवंडी) यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी कार, पिकअप टेम्पोसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा – 

‘अब्दुल सत्तारांना अजून शिवसेनेची हळद लागायची आहे’, संजय राऊतांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -