घरपालघरअवजड वाहनांसाठी मनोर -वाडा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद

अवजड वाहनांसाठी मनोर -वाडा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद

Subscribe

पावसाळ्याअगोदर या ब्रिजची दुरुस्ती करून हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी माहिती अधीक्षक अभियंता ठाणे सिद्धार्थ तांबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मनोर: मनोर -वाडा रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीतील देहरजा नदीवरील पुलाला पडलेल्या खड्ड्यांमुळे पूल कमकुवत झाला आहे. पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक सोमवार पासून बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी तीन महिने मनोरवाडा रस्ता बंद करण्यात आला आहे.वाड्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून वळवण्यात आली आहे. सार्वजनिक विभागाचे मुख्य अभियंता विकास रामगुडे(मुंबई) ,अधीक्षक अभियंता (ठाणे) सिद्धार्थ तांबे , कार्यकारी अभियंता पालघर सचिन पाटील यांच्या पथकाने पुलाची पाहणी केल्यानंतर आजपासून तीन महिन्यासाठी वाडा -मनोर महामार्ग अवजड वाहनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .पावसाळ्याअगोदर या ब्रिजची दुरुस्ती करून हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी माहिती अधीक्षक अभियंता ठाणे सिद्धार्थ तांबे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मनोर -भिवंडी राज्यमार्गावरील देहेरजे नदीवर टेन गावच्या हद्दीत 1955 साली पुलाचे बांधकाम करण्यात आले होते.पुलाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूल तज्ज्ञ आणि कार्यकारी अभियंत्यांकडून पुलाची पाहणी करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूल तज्ञ विकास रामगोटे यांनी केलेल्या पाहणीनंतर टेन बाजूकडील पहिल्या दोन खांबांदरम्यानच्या कमानी वरील स्लॅब निखळून खचल्याचे आढळून आले. पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागणार असल्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वर्तवली.दुरुस्ती करताना पुलाच्या खांबांवरील सर्वच कमानीवरील स्लॅब दुरुस्ती करावी लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

- Advertisement -

क्रशर उद्योगांला मोठा फटका

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर व्हाइट टॅपिंगच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना मनोर -वाडा रस्त्यावरील पूल कमकुवत झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडणार आहे.दुरुस्ती काळात पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक गुजरातवरून व्हाया शिडसाड -पारोळ मार्गे अंबाडी- भिवंडी, किंवा चिंचोटी -कामन मार्गे भिवंडी,तर भिवंडीवरून गुजरात दिशेने जाणारे अवजड वाहने वाडा -पाली मार्गे, विक्रमगड- चारोटी – कासा मार्गे गुजरात महामार्ग असे वळवण्यात येणार आहे.गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना मोठा वळसा घालावा लागणार असल्याने इंधन आणि वेळेचा अपव्यय होऊन मनोर -वाडा रस्त्यावरील कारखाने आणि क्रशर उद्योगांला मोठा फटका बसणार आहे.देहेरजा नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -