घरपालघरमीरा-भाईंदर शहराच्या विकासात मिठाचा खडा टाकतेय कोण?

मीरा-भाईंदर शहराच्या विकासात मिठाचा खडा टाकतेय कोण?

Subscribe

तसेच मालमत्ता व्यवस्थापन विभागात रुजू झालेल्या निवृत्त अधिकार्‍यांनी अन्य ठिकाणी ठाण मांडून बसत मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे दुर्लक्ष केल्यानेच विकास थांबल्याचे नागरिक म्हणत आहेत.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरातील मीठ विभागांच्या रहदारीचे पूर्ववत रस्ते आणि जनतेच्या सोयीसाठी शहरांच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांच्या जागांचे मूल्यांकन करून ते मीठ विभागांना सादर करणे आवश्यक आहे.परंतु, त्या जमिनींचे चालू वर्षाच्या मंजूर आणि बाजारभावानुसार मूल्यांकन ( रेडीरेकनर ) करून होत नसल्याने पालिकेच्या अनेक विकास कामांत खोडा तयार झाला आहे. तसेच मालमत्ता व्यवस्थापन विभागात रुजू झालेल्या निवृत्त अधिकार्‍यांनी अन्य ठिकाणी ठाण मांडून बसत मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे दुर्लक्ष केल्यानेच विकास थांबल्याचे नागरिक म्हणत आहेत.

मीरा -भाईंदर महापालिकेत ठिक ठिकाणी रस्ते व शौचालय असलेल्या जागेत त्यांचे मूल्यांकन ( व्हॅल्यूवेशन ) करून मीठ विभागाच्या बाधित जमीन पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी त्याचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे.तसेच त्याचा आराखडा तयार करून केंद्र शासनाच्या जयपूर येथील मीठ विभागाला आणि केंद्रीय वाणिज्य विभागाला अहवाल सादर करायचा आहे. पण ते काम करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन मिळकत विभागांनी घेतलेले सेवानिवृत्त पालिका अधिकारी सेवेत असताना ते काम करताना दिसत नाहीत. तसेच मिळकत विभागाचे अधिकारी नगररचना विभागात चिटकून बसलेले आहेत. महापालिका हद्दीतील मीठ विभागाच्या जमिनींवर ग्रामपंचायत, नगरपरिषद ,नगरपालिका आणि महानगरपालिका काळात बांधलेल्या बाधित सार्वजनिक शौचालय आणि सार्वजनिक रहदारीचे रस्ते तसेच नव्याने विकसित करायचे विकास आराखड्यातील बाधित रस्ते हे विकसित करण्यासाठी मीठ विभागाची मंजुरी आवश्यक आहे.ती मंजुरी घेऊन जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी त्याचे मूल्यांकन सादर करावे लागते. त्यात मीरा- भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र मैदान, उत्तन कुंभार्डा रोड, मीरारोड रेल्वे स्थानक ते भाईंदर समांतर रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानक ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -