घरपालघरवाडा नगरपंचायतीचे अडीच कोटी रुपये थकवले

वाडा नगरपंचायतीचे अडीच कोटी रुपये थकवले

Subscribe

कर वसुलीचे प्रमाण अल्प असून येथील स्ट्रीट लाईट, मोटार पंपासाठी लागणारा विजेचा खर्च तसेच रोजंदार कर्मचार्‍यांचे वेतन खर्च भागवणे नगरपंचायत प्रशासनाच्या नाकेनऊ येऊ लागले आहे.

वाडा: दि.९ वाडा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक रहिवाशांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी कराची रक्कम गेल्या काही वर्षांपासून भरलेली नाही. वारंवार सुचना, नोटीसा देऊनही करधारक थकित रक्कम भरण्यास तयार नसल्याने या थकित करधारकांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची थकबाकी झाल्याने येथील रोजंदारीवर असलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन तसेच विजेचे देयके भरण्यासाठी आर्थिक विवंचनेत नगरपंचायत प्रशासन सापडले आहे. 35 हजार लोकसंख्या असलेल्या वाडा नगरपंचायत कार्यक्षेत्रात 8 हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. येथील वार्षिक एकूण घरपट्टीची रक्कम 1 कोटी 52 लाख रुपये आहे. सन 2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला फक्त दिड महिना शिल्लक राहिला तरी फक्त 56 लाख रुपयांची वसुली झाली आहे. अजुनही 96 लाख रुपयांच्या घरपट्टीची वसुली थकित आहे. पाणीपट्टीबाबत हिच बोंब आहे. 1 कोटी 79 लाख रुपये थकित पाणीपट्टी असून आतापर्यंत वर्षभरात फक्त 14 लाख 92 हजार रुपयांची वसुली झाली आहे. कर वसुलीचे प्रमाण अल्प असून येथील स्ट्रीट लाईट, मोटार पंपासाठी लागणारा विजेचा खर्च तसेच रोजंदार कर्मचार्‍यांचे वेतन खर्च भागवणे नगरपंचायत प्रशासनाच्या नाकेनऊ येऊ लागले आहे.

 

- Advertisement -

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक
करापोटी मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा येथील पाणी पुरवठा करणार्‍या विद्युत मोटर्स, शहरातील स्ट्रीट लाईट यासाठी प्रति महिना 5 लाख रुपयांहून अधिक खर्च येत आहे. रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार आणि अन्य खर्च हा करातून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे येथील प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अनधिकृत नळजोडण्यांचे प्रमाण अधिक

- Advertisement -

शहरातील एकूण कुटुंब संख्येच्या 15 ते 20 टक्के नळजोडण्या या अनधिकृत असून वर्षोनुवर्षे या अनधिकृतपणे पाण्याचा वापर करणार्‍या नळधारकांकडून कुठल्याही प्रकारचा कर नगरपंचायतीला मिळत नसल्याचे शहरातील एका जबाबदार नागरिकानो सांगितले.

सुविधांचा उपभोग घेऊनही कर न भरणार्‍या थकित करधारकांवर येत्या दोन दिवसांत जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

– मनोज पष्टे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -