भाईंदर : मीरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लास्टिक वापर व अस्वच्छता पसरविणार्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. १६ ते २१ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लास्टिक वापर व अस्वच्छता पसरविणार्या विरोधात दंडात्मक कारवाई करून ६ लाख ४६ हजार ७०२ रुपये इतका दंड वसूल केला आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक १ ते प्रभाग समिती क्रमांक ६ अंतर्गत नियमित महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या टीम मार्फत प्लास्टिक वापर व अस्वच्छता पसरविणार्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. प्रभाग समिती क्रमांक १ व २ मध्ये स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने १ लाख ४० हजार ७५० रुपये, प्रभाग समिती क्रमांक ३ व ४ मध्ये स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने ३ लाख १४ हजार ७५० रुपये, प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने ४० हजार १०० रुपये आणि प्रभाग समिती क्रमांक ६ मध्ये स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने १ लाख ५१ हजार १०२ रुपये अशी एकूण ६ लाख ५६ हजार ७०२ रुपये एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली आहे. पालिकेकडून प्लास्टिक बंदी कारवाई, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवणे इत्यादी प्रकारे महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छतेचे महत्व जाणत आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच राबवण्यात आले आहेत. तसेच सफाई कर्मचार्यांचे शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाचे योगदान तर आहे. पण यासोबतच आपण सर्व नागरिकांनी देखील शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मीरा -भाईंदर महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे.
Mbmc: अस्वच्छता पसरविणार्या विरोधात दंडात्मक कारवाई
written By My Mahanagar Team
Bhayandar