घरपालघरइंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेतीही अडचणीत

इंधन दरवाढीमुळे यांत्रिक शेतीही अडचणीत

Subscribe

शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत.

शेतीचे काम करण्यासाठी बैलजोडीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच मजुरीने न उरकणारी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बळिराजा आपल्या शेतीतील मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहे. मात्र, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंत्राद्वारेही शेती करणे कठीण जात आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. शेतकरी आता पर्यायी पिकांची लागवड करीत आहेत. दरम्यान, काही मोजके शेतकरी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करून घेत आहेत. काही वर्षांपासून सालगड्याच्या मजुरीत वाढ झाल्याने बळिराजाने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. शेतीतील संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळिराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

बळिराजाला शेतीतून उत्पन्न घेण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यातच दरवर्षी नैसर्गिक संकटे येत असल्याने बळिराजाचे शेतीचे गणित एकदमच बिघडत चालले आहे. त्यातच मजुरांचे वाढते दर, उत्पादन कमी व खर्च मात्र अधिक अशा दुहेरी संकटात शेतीव्यवसाय सापडला आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी बळिराजाची धडपड सुरू आहे. आजही कोरोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र, मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून राहावे लागत असून, अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

- Advertisement -

बैलजोडीच्या मदतीने शेती करावी तर एका जोडीची किंमत लाखाच्या घरात आहे. आणि यंत्राद्वारे शेती करावी, तर इंधनांचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतुनाशके औषधे, खते, आदींच्या किंमती शेतीला परवडण्यासारख्या नाहीत. पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
– हिरामण झुगरे, शेतकरी, हुंड्याची वाडी

पेट्रोल, डिझेल किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला असून, शेती मशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मशागतीचा खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. खरीपाच्या ऐन तोंडावर शेतकऱ्यांना एकरी ३०० ते ५०० रुपये अधिकचे मोजावे लागत आहे. शेतीची कामे पूर्वी प्रामुख्याने बैलजोडीद्वारे केली जात होती. बैलांच्या मदतीने नांगरणी, पेरणी अशा प्रकारचे सर्व कामे केली जात होती.परंतु गेल्या काही वर्षात जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करतात. कमी वेळात काम होत असल्याने शेतकऱ्यांनी त्यास प्राधान्य देतात. नांगरणी, फवारणी, पेरणी, पीक वाहतुक करणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने होऊ लागली आहे. यातूनच ट्रॅक्टर तासांवर भाड्याने देण्याचा व्यवसायाने ग्रामीण भागात चांगलाच रुजला आहे.

- Advertisement -

ट्रॅक्टरद्वारे नांगरणीसाठी गेल्या वर्षी ८०० ते १००० रुपये एकरी द्यावे लागत होते. परंतू यंदा १४०० ते १८०० रुपये एकरी भाव झाला आहे. इंधन महाग झाल्याने ट्रॅक्टरचालकांनी भाडे दरातही भाव केली असून काही भागात कमी अधिक भाव आहे.परंतु हे भाव सर्वांना परवडणारे नाहीत. यंदा जादा भाव देणे शक्य नसल्याने बैलजोडीच्या मदतीनेच मशागतीचे काम हाती घेतली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. जिल्ह्यात सध्या पेट्रोलने शंभरीपार गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांचीदेखील भाडेवाढ झाली आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. गतवर्षी शेत नांगरणीसाठी ९०० रुपये मोजावे लागत होते. चालू वर्षात हे दर १२०० ते १४०० पर्यंत गेले आहेत.

हेही वाचा – 

मुंबई विमानतळाचा ताबा अदानीकडे; हजारो नवे जॉब्स निर्माण करण्याचे आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -