घरपालघरमीरा -भाईंदर पोलिसांचा नशेखोरांवर सर्जिकल स्ट्राईक

मीरा -भाईंदर पोलिसांचा नशेखोरांवर सर्जिकल स्ट्राईक

Subscribe

पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या सुचनेनुसार सर्वच पोलीस ठाण्यांत कोंबिंग ऑपरेशन राबवत कारवाया करण्यात आल्या आहेत.

भाईंदर :- मीरा – भाईंदर परिमंडळ -१ मध्ये पोलिसांनी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविले. यावेळी शहरातील विविध ठिकाणी गांजा या अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या आणि गावठी दारू विक्री करणार्‍यांविरोधात १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात भाईंदर पोलीस ठाणे ३, नवघर २, काशीमिरा २, नया नगर ५, मीरारोड ३ आणि उत्तन येथे गावठी दारू विक्री प्रकरणी असे एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गांजा या अमली पदार्थाचे सेवन करून त्याठिकाणीच आरडाओरडा आणि धुडगूस घालणार्‍या नशेडी लोकांच्या विरोधात दारूबंदी कायदा आणि अमली पदार्थाचे सेवन करणे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या सुचनेनुसार सर्वच पोलीस ठाण्यांत कोंबिंग ऑपरेशन राबवत कारवाया करण्यात आल्या आहेत.

मीरा- भाईंदर पोलिसांनी मोकळ्या जागेत आणि भिंतीच्या आडोशाला लपून बसत मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले. तसेच उत्तन सागरी पोलीस ठाणे येथे गावठी दारू विक्री आणि सेवन करणार्‍या दोन जणांच्या विरोधात दारूबंदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी अमली पदार्थ गांजा यांचे सेवन करणार्‍यांविरोधात १७ गुन्हे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या आदेशानुसार भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, नया नगर पोलीस ठाण्याचे विलास सुपे, काशीमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे दाराराम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -