घरपालघरविजेच्या धक्क्याने दुभत्या म्हैशीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने दुभत्या म्हैशीचा मृत्यू

Subscribe

गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सरजिल शेख यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूस वैतरणा नदीच्या दिशेने वीजपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या विजवाहिन्यांमधील एक वीजवहिनी तुटून पडली होती.

मनोर :दहिसर तर्फे मनोर गावात तुटलेल्या विजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्याने दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले असून महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दहिसर तर्फे मनोर गावातील शेतकरी फारूक शेख यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे.दुधाच्या उत्पन्नासाठी शेख यांनी आठ ते दहा म्हैशी पाळल्या आहेत.म्हैशींपासून मिळणारे दूध गाव तसेच सफाळे बाजारपेठेत विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.गुरुवारी सकाळी म्हैशींचे दूध काढल्यानंतर म्हैशी चारण्यासाठी त्यांच्या शेतावर घेऊन गेले होते.

गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सरजिल शेख यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूस वैतरणा नदीच्या दिशेने वीजपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या विजवाहिन्यांमधील एक वीजवहिनी तुटून पडली होती.जमिनीला स्पर्श झालेल्या विजवाहिनीतून वीजपुरवठा सुरू होता.फारूक शेख यांच्या कळपातील एक म्हैस तुटलेल्या विजवाहिनीच्या संपर्कात आल्याने म्हैशीला विजेचा धक्का बसला,विजेच्या धक्क्याने म्हैशीचा जागीच मृत्यू झाला.सुमारे एक लाख रुपये किंमतीच्या दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे म्हैशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नुकसान भरपाईची मागणी शेतकरी फारूक शेख यांनी केली आहे.महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे.घटनेची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -