घरपालघरमीरा -भाईंदर महापालिकेची १९३ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली

मीरा -भाईंदर महापालिकेची १९३ कोटींची विक्रमी मालमत्ता कर वसुली

Subscribe

या कारवाईस सुरुवात होताच व जनजागृती केल्या कारणाने शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात १९३ कोटींची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. मीरा -भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत ३१ मार्च २०२४ रोजी मध्यरात्रीपर्यंत १९३ कोटींची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीचा वेग हा जास्त प्रमाणात वाढवण्यात यावा यासाठी मीरा -भाईंदर महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या मालमत्ता कर विभाग आढावा बैठकीनुसार शहरातील मालमत्ता कराचा सतत पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मीरा -भाईंदर शहरामधील बर्‍याच मालमत्ता धारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असल्याने अशा वर्षानुवर्षे थकित असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत महापालिका आयुक्तांनी त्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात व त्यावर महापालिकेचे नाव चढवून त्या मालमत्ता जाहीर लिलावद्वारे विक्री करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत सतत शहरातील नागरिकांमध्ये विशेष जनजागृती देखील करण्यात आली होती. या कारवाईस सुरुवात होताच व जनजागृती केल्या कारणाने शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली.

या कारवाईचे परिणाम म्हणून ३१ मार्च २०२४ रोजी मध्यरात्रीपर्यंत मीरा- भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागाकडून १९३ कोटींची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. १९३ कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (कर विभाग), नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे. मागील वर्षी ३१ मार्च २०२३ रोजी १८२ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही उत्कृष्टरित्या व वेगाने झाली आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्या विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या www.mbmc.gov.in वेबसाईट व MyMBMC मोबाईल पचा वापर करून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत १ लाख १० हजार ९७४ नागरिकांनी तर रोख रक्कमद्वारे १ लाख ७३ हजार ५७३ नागरिकांनी कर भरणा करून महापालिकेस सहकार्य केले आहे. मीरा- भाईंदर महापालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर १९३ कोटी ८ लाख ३६ हजार २५३ इतका जमा करण्यात आला आहे. आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थापनेपासून आज पर्यंतची सर्वात जास्त मालमत्ता कराची १९३ कोटी विक्रमी वसुली करण्यात आली. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कर वसुलीसाठी केलेल्या प्रयत्नाचे हे फळ असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -