घरपालघररखरखत्या उन्हात प्रवाशांना पालिकेची गारेगार बससेवा

रखरखत्या उन्हात प्रवाशांना पालिकेची गारेगार बससेवा

Subscribe

कडक उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असतानाच मुंबई आणि ठाणेकरीता वातानुकूलित बससेवा कोरोना काळातदेखील शुक्रपासून सुरू करण्यात आलेली आहे.

कडक उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असतानाच मुंबई आणि ठाणेकरीता वातानुकूलित बससेवा कोरोना काळातदेखील शुक्रपासून सुरू करण्यात आलेली आहे. या बससेवेचे उद्घाटन मिरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याहस्ते करण्यात आले आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर डिंपल मेहता यांनी केलेल्या मागणीची दखल घेत परिवहन समितीचे सभापती दिलीप जैन यांनी या वातानुकूलित बससेवेला हिरवा कंदिल दाखवला आहे. सदरहु बससेवा शुक्रवारी सकाळी 8 व 9 वाजता बालाजी हॉस्पीटल, गोल्डन नेस्ट येथून सुरु झाली आहे. संध्याकाळी ५ व ६ वाजता या बसेस सोडण्यात येणार आहेत. हा बस मार्ग भाईंदर पूर्व गोल्डन नेस्टपासून एस. के. स्टोन मीरारोड रेल्वे स्थानक, पेणकरपाडा, दहिसर चेकनाका पासून बोरीवली ते अंधेरी पूर्व असा राहणार आहे.

या बससेवेचे किमान भाडे २० रुपये तर जास्तीत जास्त ८० रुपये इतके असणार आहे. त्याचप्रमाणे भाईंदर पश्चिम ते ठाणे आणि मिरारोड पुर्व ते ठाणे असा नवा वातानुकूलित बससेवेचा मार्ग राहणार आहे. या बससेवेचे उद्घाटन झाल्यानंतर महापौर, आयुक्त यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या वातानुकूलित बसमधूनच महापालिका मुख्यालयापर्यंतचा प्रवास केला.

- Advertisement -

मागील १४ महिन्यांपासून बंद असलेली भाईंदर पूर्व ते ठाणे आणि मिरारोड पूर्व ते ठाणे या मार्गावरील वातानुकूलित बस सेवेला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्याहस्ते या वातानुकूलित बससेवेला हिरवा कंदिल दाखवला आहे. याप्रसंगी उपमहापौर हसमुख गेहलोत, आयुक्त दिलीप ढोले, स्थायी समिती सभापती दिनेश जैन, सभागृह नेते प्रशांत दळवी, परिवहन सभापती दिलीप जैन, विरोधी पक्षनेते प्रविण पाटील, परिवहन व्यवस्थापक अजित मुठे व माजी महापौर डिंपल मेहता यांच्यासह भाजपाचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा –

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -