घरपालघरमिरा भाईंदर महापालिकेला मिळणार मंजूर झालेले दीड दशलक्ष लीटर पाणी

मिरा भाईंदर महापालिकेला मिळणार मंजूर झालेले दीड दशलक्ष लीटर पाणी

Subscribe

मिरा भाईंदर महानगरपालिकेला मंजूर करण्यात आलेल्या १.५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ जोडून देण्याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन याप्रकरणी कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

मुंबई महानगरपालिकेकडून मिरा भाईंदर महानगरपालिकेला मंजूर करण्यात आलेल्या १.५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ जोडून देण्याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन याप्रकरणी कार्यवाही करण्याची विनंती केली होती. त्यावर तात्काळ मिरा भाईंदरला हे दीड द.द.ली. पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांना केल्या आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात मिरा भाईंदरला आपल्या हक्काचे हे दीड एमएलडी पाणी मिळणार आहे, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

मिरा भाईंदर महापालिकेला एमआयडीसीकडून १३५ द.द.ली. तर स्टेम प्रधिकरणाकडून ८६ द.द.ली पाणीपुरवठा होत आहे. मुंबईच्या वेशीवर असलेल्या मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याकारणाने तसेच सातत्याने जुन्या व जीर्ण झालेल्या पाईपलाईन फुटण्याचे प्रकार होत असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात घट होत आहे. त्यामुळे शहरामध्ये तीन-तीन, चार-चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे सांगत शहरातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीवर आमदार सरनाईकांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेचे प्रवेशद्वार उभारायचे काम चालू असताना मुंबई महापालिकेकडून मिरा भाईंदरला करण्यात येणारा पाणीपुरवठा पाईपलाईन तुटल्यामुळे बंद करण्यात आला होता. परंतू या प्रवेशद्वार कमानीचे काम पूर्ण झाल्यानंतरही तो पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही. तसेच हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी टाकण्यात आलेल्या नवीन क्रॉस पाईप लाईनची सुरक्षा अनामत रक्कम २२ लाख २० चा भरणा केलेला आहे. तसेच पाईप जोडणीकरता लागणार्‍या साहित्याचे शुल्क ४ लाख ३४० रुपये देखील अदा करण्यात आली. सद्यस्थितीत खंडीत असलेल्या जलजोडण्याच्या देयकांची एकूण थकीत रक्कम १० लाख ६४ हजार इतकी अभय योजने अंतर्गत मिरा भाईंदर महापालिकेतर्फे मुंबई महापालिकेला अदा करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असतानाही अद्यापपर्यंत हा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या हायड्रोलिक इंजिनियरकडे प्रलंबीत आहे. या संदर्भात मी सातत्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच याबाबत मुंबईचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महापालिकेकडून जलदगतीने कार्यवाही होण्याची अपेक्षा असून पुढील काही दिवसात मिरा भाईंदरला आपल्या हक्काचे दीड द.द.ली. पाणी मिळणार आहे, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा –

सांडपाण्यापासून तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनवर ट्रक आणि कार चालवणार – नितीन गडकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -