Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर पालघर अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील काशीमिरा भागात माशाचा पाडा परिसरात अतिक्रमण विभागांने चाळमाफियांना हादरा देत महापालिकेने २७ बांधकामांवर तोडक कारवाई केली आहे महापालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदशनाखाली अतिक्रमण विभागाने बुधवारी ही कारवाई केली.

Related Story

- Advertisement -

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील काशीमिरा भागात माशाचा पाडा परिसरात अतिक्रमण विभागांने चाळमाफियांना हादरा देत महापालिकेने २७ बांधकामांवर तोडक कारवाई केली आहे महापालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदशनाखाली अतिक्रमण विभागाने बुधवारी ही कारवाई केली. माशाचा पाडा येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात भूमाफियांनी अनाधिकृत खोल्या बांधून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबाबतची तक्रार उपायुक्त मुठे यांना आल्यानंतर त्यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त मुठे यांनी प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत व अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण यांना सदर अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर आदेशानुसार बुधवारी महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने येथील २७ बांधकामांवर हातोडा चालवून ती जमिनदोस्त केली.

यावेळी १९ खोल्या व आठ दुकाने तोडण्यात आली आहेत. यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत, कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक पाटील त्यांच्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते. याप्रकरणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुठे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या अनधिकृत बांधकामात मनोज चव्हाण याचा सहभाग असल्याचे उजेडात आले आहे. चव्हाण याच्याविरोधात याआधी एमआरटीपीचे अऩेक गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या महापालिकेच्या पथकावर चव्हाण याने साथिदारांसह दगडफेक केली होती. येथील अनधिकृत बांधकामांना महापालिकेकडून घरपट्टी आकारणी केली जात आहे. तसेच वीज जोडणीही दिली जाते. त्यामुळे अऩधिकृत बांधकामांना सरकारी अधिकारी पाठबळ देत असल्याचा आरोप केला जातो.

दरम्यान, मीरा भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. नुकतीच मानसी बार या अनधिकृत डान्सबारवर उपायुक्त अजित मुठे यांचे नेतृत्वाखाली प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी कारवाई करुन हा बार जमिनदोस्त केला. त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नियोजित स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात झोपडीधारकांनी अतिक्रमण केले होते, त्याठिकाणी कारवाई करण्यात येऊन कलादालनाची जागा मोकळी करण्यात आली.

हेही वाचा –

- Advertisement -

नुकसानग्रस्तांच्या व्यथा केंद्रापुढे मांडणार; केंद्रीय पथक प्रमुखांची माहिती

- Advertisement -