घरपालघरआमदार भुसारा वि.जिल्हाधिकारी बोडके वाद पेटला

आमदार भुसारा वि.जिल्हाधिकारी बोडके वाद पेटला

Subscribe

यावेळी जिल्हाधिकारी बोडके यांचा जाहीर निषेध करून तसे निवेदनही शासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना देण्यात आले आहे.

मोखाडा : जिल्हा आदिवासी उपाययोजनेसाठी घेण्यात आलेल्या बैठकीतून आता नवा वाद समोर आला असून विक्रमगड विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्यामधील या वादाला आंदोलनाचे स्वरूप आले आहे. मंत्रालयातील एका बैठकीत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एका विषयावरील चर्चे दरम्यान मला तुम्हालाच काय कोणालाही काही विचारायची गरज नाही, अशा प्रकारे उर्मट वर्तन करून अपमान केल्याचा आरोप करीत यासंदर्भात आदिवासी लोकप्रतिनिधीचा अपमान केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बोडके यांचा जाहीर निषेध करून तसे निवेदनही शासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांना देण्यात आले आहे.

जिल्हा आदिवासी उपाययोजनेसाठी यासाठी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत,पालकमंत्री पालघर तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे ६ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते.यावेळी एका विषयांवर बोलताना आमदार भुसारा यांनी या बैठकीच्या अगोदर त्या विषयाचा आढावा घेतला असता तर या बैठकीचे अजूनही चांगले नियोजन होवून विषय मांडता आले असते असे सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी बोडके यांनी मला कोणालाही विचारायची गरज नसून तुम्हालाही विचारायची गरज नसल्याचे सांगत मला जे कळते ते मी केलेले आहे असे सांगत अतिशय गैरवर्तन केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. सर्व अधिकारी, मंत्री आमदारांच्या उपस्थितीत राजशिष्टाचाराचे पालन न करता अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आमदार सुनिल भुसारा यांनी केला असून आदिवासी लोकप्रतिनिधीला अपमानित केल्याप्रकरणी बोडके यांच्यावर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार कुलाबा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हाभर आंदोलन केले. यावेळी मोखाडा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करीत चक्काजाम करण्यात आला.तर जिल्हाधिकारी बोडके यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी,काँग्रेस तालुकाध्यक्ष जमशीद शेख,बविआ अध्यक्ष अमजद अंसारी युवानेते दयानंद भुसारा,कार्याध्यक्ष दिलीप जागले,शहराध्यक्ष रफिक मणियार,तय्यब शेख वैभव पाटील सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अनिल दोंदे,सुनिल कस्तुरे,रामदास कोरडे माजी उपसभापती लक्ष्मीताई भुसारा,युवक शहराध्यक्ष तनवीर तांबोळी,सौरभ खरोटे,मनोज पाटील,श्याम जाधव आदि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -