Eco friendly bappa Competition
घर पालघर डहाणू- तलासरी तालुक्यात पहिल्यांदाच आमदार मॅरेथॉन

डहाणू- तलासरी तालुक्यात पहिल्यांदाच आमदार मॅरेथॉन

Subscribe

प्रथम १० विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदके दिली जातील. मॅरेथॉन स्पर्धा फक्त डहाणू आणि तलासरी तालुक्यापुरतीच मर्यादित आहे.

डहाणूः डहाणू व तलासरी तालुक्यात पहिल्यांदाच नूतन बाल शिक्षण संघ , कोसबाड यांच्यावतीने आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणूत १७ सप्टेंबर २०२३ तर तलासरीत १ ऑक्टोबर २०२३ ला मॅरेथॉन होणार आहे. खुला आणि आरक्षित अशा दोन गटात मॅरेथॉन होईल. डहाणूत वाकी येथे मॅरेथॉन होईल. तर तलासरीत गोदावरी परुळेकर कॉलेजमध्ये मॅरेथॉन होईल. प्रथम १० विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदके दिली जातील. मॅरेथॉन स्पर्धा फक्त डहाणू आणि तलासरी तालुक्यापुरतीच मर्यादित आहे.

मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी सुरु झाली असून इच्छुकांनी डहाणूसाठी क्रीडा शिक्षक सुभाष झिरवाळ , प्रमिला पालवा आणि तलासरीसाठी गणेश खरपडे , सुजित वाघात यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “एक धाव आरोग्यासाठी , या उद्देशाने आमदार मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या तालुक्यातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणे हाही त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन आमदार विनोद निकोले यांनी केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -