घरपालघरआमदार सुनिल भुसारांनी घेतली त्या कुटुंबियांची भेट

आमदार सुनिल भुसारांनी घेतली त्या कुटुंबियांची भेट

Subscribe

याशिवाय आदिवासींच्या आरोग्याबाबात हलगर्जी पणा करणार्‍या यंत्रणाबाबत हयगय केली जाणार नसल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.

मोखाडा : तालुक्यातील सायदे येथील छाया भोई या सात वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. याला कारणीभूत वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी या मुलीच्या पालकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार सुनिल भुसारा यांनी या कुटुंबाची भेट घेतली.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडेही याबाबत चौकशी केली. पिडीत कुटुंबाचे सांत्वन करून आर्थिक मदतही केली. तसेच पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्याशी संपर्क करून दोषींवर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. याशिवाय आदिवासींच्या आरोग्याबाबात हलगर्जी पणा करणार्‍या यंत्रणाबाबत हयगय केली जाणार नसल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.

तर भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सदस्य डॉ.हेमंत सवरा यांनीही या कुटुंबाची भेट घेवून परिस्थितीची माहिती घेतली.त्यांनी अन्न धान्याची मदत करून सांत्वन केले.केवळ उपचार वेळेत न झाल्याने एका आदिवासी बालिकेचा जीव जावा ही बाब अतिशय क्लेषदायक असून खोडाळा येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावा, अशी माझी मागणी असून या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासंबधी पालकमंत्री आणि संबंधित विभागाशी बोलणार असल्याचे यावेळी सवरा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -