घरपालघरमला वेड लागले...रिल्सचे , मोबाईल वापर कर्त्यांना रिल्स बघण्याचे जडले व्यसन

मला वेड लागले…रिल्सचे , मोबाईल वापर कर्त्यांना रिल्स बघण्याचे जडले व्यसन

Subscribe

या ३० सेकंदांच्या रिल्समधून ते एखाद्या उत्पादनाची जाहिरात करू शकतात. यासाठी अनेक ब्रँडकडून त्यांना संपर्क केला जात आहे. या रील्स आकर्षक स्वरूपात शूट करण्यासाठी तंत्रज्ञाची गर्दी झालेली आहे.

जव्हार: आजची शिक्षण घेणारी तरुणाई किंवा छोटी मोठी नोकरी करणार्‍यापर्यंत सगळ्यांना मोबाईलमधील रिल्स पाहण्याचे चांगलेच व्यसन जडले असून, आभासी दुनियेत रमण्याचा घातक प्रकार घडत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जव्हार शहर आणि ग्रामीण भागात जवळपास बर्‍याच ठिकाणी इंटरनेट रेंज उपलब्ध व्हायला लागल्याने, मोबाईल हे संवाद साधणे व माहिती-तंत्रज्ञानाचे प्रमुख साधन, ही सकारात्मक बाजू असली तरी दुसर्‍या बाजूला सतत मोबाईलवर रिल्स पाहण्यासाठी लाखमोलाचा वेळ वाया घालवत आहेत.त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकाव कसा लागावा अशी चिंता सतावत आहे. अलिकडे अगदी क्षुल्लक प्रसंगाचे छोटे-छोटे व्हिडिओ तयार केले जात आहे. या रिल्स आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर “अपलोड” करणे आणि त्यावरील प्रतिक्रियेत अनेकजण रममाण होताना दिसून येत आहे.अशा कमी वेळातल्या व्हिडिओ कन्टेन्ट चा आशय कोण कशाप्रकारे घेतो, यावर पण भरपूर काही अवलंबून आहे. विशेष म्हणजे लाखो “फॉलोअर्स” असलेल्यांना यातून कमाईच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

या ३० सेकंदांच्या रिल्समधून ते एखाद्या उत्पादनाची जाहिरात करू शकतात. यासाठी अनेक ब्रँडकडून त्यांना संपर्क केला जात आहे. या रील्स आकर्षक स्वरूपात शूट करण्यासाठी तंत्रज्ञाची गर्दी झालेली आहे. त्यासाठीचा मजकूर लिहणारे अनेकजण तयार झालेले आहेत. अशा प्रकारे या रिल्सभोवती एक छोटीशी अर्थव्यवस्थाच उभी राहिलेली आहे. ही चांगली सकारात्मक बाजू आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला, नेहमी वारंवार रिल्स पाहणार्‍यांची संख्या अधिक आहे. यात तरुणाईचा वेळ व्यर्थ जात आहे. एका संस्थेच्या पाहणीनुसार भारतात दररोज ६० लाखांहून अधिक रिल्स तयार होत आहेत. हे सर्व रिल्स समाजमाध्यमांवर अपलोड केले जातात. रिल्सच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण काल्पनिक जगात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. युवकांना आता आभासी जग आवडू लागले आहे. या जगातच स्वतःच्या सुख-दुःखाचा शोध घेत आहेत. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊन त्यांची स्मरणशक्ती क्षीण होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एखाद्या व्यसनी व्यक्तीप्रमाणे रिल्स पाहण्याचे व्यसन लागत असून तरुणाई दिशा भटकत आहे. व्हीडीओवर जास्तीत जास्त व्हिव्यूज मिळवण्यासाठी रिल्समध्ये अश्लिल आणि खूपच सुमार भाषेचा वापर केला जात आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट टाकणे, स्टेट्स ठेवणे, मेसेज पाठवणे, त्यावरील “रिप्लाय”, “लाईक्स”, “कमेंट्स” पाहणे या सर्वांसाठी तासनतास वेळ घालवणे ही असंख्य युवक-युवतींची दिनचर्या झाली असून याबाबत आता समाजात चिंताही व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

**मनोरंजनाच्या नावे होतोय दुरुपयोग**
सध्याच्या काळात मोबाईल ही वाईट गोष्ट नाही.तर ते संवाद, माहिती-तंत्रज्ञानाचे साधन आहे. संवादासह याचा वापर माहिती तंत्रज्ञानासाठी केला पाहिजे. मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी की टाईमपास म्हणून करायचा, हे ठरवले पाहिजे. रिकाम्या मनाची माणसे मोबाईलशी जुळली जातात. मनोरंजनाच्या नावाखाली वेळचा दुरुपयोग केला जात आहे, ही बाब चिंतेची असल्याचे अभ्यासक सांगतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -