Eco friendly bappa Competition
घर पालघर केआरए मूल्यमापनात मोखाडा नगरपंचायत राज्यात चौथी

केआरए मूल्यमापनात मोखाडा नगरपंचायत राज्यात चौथी

Subscribe

विशेष म्हणजे आदिवासी आणि दुर्गम प्रदेशातील असूनही नगरपंचायतीने मिळवलेल्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मोखाडा : राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 आयोजित केली होती. यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून सदरची निवड केली होती त्यांचे आज बक्षीस वितरण करण्यात आले. नगर पंचायतीच्या केआरए मुल्यमापन गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांकरिता शहर सुधारणा व सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 आयोजित केली होती.यामध्ये अगदी नव्याने असूनही मोखाडा नगरपंचायतीने राज्यात चौथा क्रमांक पटकावल्याबद्दल तालुक्यातून अभिनंदन होत आहे.विशेष म्हणजे आदिवासी आणि दुर्गम प्रदेशातील असूनही नगरपंचायतीने मिळवलेल्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या मूल्यमापनामध्ये स्वच्छता,घनकचरा विलगीकरण प्रक्रीया, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण ,याशिवाय ५० वर्षांची पाणीपुरवठा योजना असूनही सुरळीत होणारा पाणीपुरवठा,नगरपंचायत क्षेत्रात असलेले चांगले रस्ते, शासकीय कागदपत्रांची व्यवस्था, विकास आराखडा. नवीन पाणीपुरवठा योजनेचा बनवलेला प्रस्ताव यामध्ये विविध घटकांनुसार गुणांकन पद्धतीने वर्गनिहाय प्रत्येक प्रशासकीय विभागातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट महानगरपालिका व नगरपालिका यांची राज्यस्तरीय तपासणी समितीने पाहणी करून सदरची निवड केली. मोखाडा नगर पंचायतीने केआरए मुल्यमापन गटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्ष अमोल पाटील यांचा विशेष गौरव करीत नगर पंचायतीस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.सर्व क्षेत्रात नगरपंचायतीने केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

यावेळी नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक. किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रतिक्रिया
” हा पुरस्कार खरे तर माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांचा आहे.अशा पारितोषिकामुळे काम करण्यास अधिक बळ मिळते.यासाठी सर्व नगरसेवक मुख्याधिकारी आणि सर्व टीमने जीवापाडा मेहनत घेतली आहे. आपली नगरपंचायत याहीपेक्षा अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अमोल पाटील
नगराध्यक्ष, नगरपंचायत मोखाडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -