घरपालघरबोहाडा उत्सवासाठी मोखाडा नगरपंचायत सज्ज

बोहाडा उत्सवासाठी मोखाडा नगरपंचायत सज्ज

Subscribe

असे आवाहन मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे. नगरपंचायतीने केलेल्या उपाययोजनांची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

मोखाडा : देशभरातून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोखाडा जगदंबा मातेच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. येत्या १२ मार्च रोजी लहान बोहाडा १३ रोजी मोठा बोहाडा आणि १४ मार्च रोजी जगदंबा माता भव्य मिरवणूक असे या यात्रेचे स्वरूप असून लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांच्या स्वागतासाठी मोखाडा नगरपंचायत सज्ज झाली आहे. छोटे- मोठे दुकानदार, भाविक ,पाहुणे मंडळी यांची गैरसोय होणार नाही, यासाठी नगरपंचायतीकडून विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून भाविकांनी नि:संदिग्ध या यात्रेस यावे असे आवाहन मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे. नगरपंचायतीने केलेल्या उपाययोजनांची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

मोखाडा बोहाडा उत्सवासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सलग ३ दिवस येत असतात. त्यात कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव छोटेखानी करून गेल्या दोन वर्षात जगदंबा मंदिर ट्रस्टने कोरोनाच्या नियमांचे पालन केले होते. यंदा मात्र कोरोनाचे संकट टळल्याने हा उत्सव भव्य दिव्य होणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिक भाविक या यात्रेस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. या यात्रेदरम्यान कसलीही गैरसोय होवू नये यासाठी नगरपंचायत मोखाडाकडून सर्व दुकानदारांना जागा मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच जागी गर्दी होवू नये यासाठी पाळणे खेळणे यांची जागा आणि प्रत्यक्ष सोंग नाचवण्याची जागा यामध्ये मोठ्याप्रमाणावर अंतर देवून गर्दी विभागण्याचे कामही करण्यात आले आहे. याशिवाय यात्रेदरम्यान कचरा होवू नये स्वच्छता रहावी यासाठी नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाला कामांचे स्वरूप वाटून दिले आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोखाडा पोलीस निरीक्षक तसेच जगदंबा मंदिर ट्रस्ट यांच्या बैठकाही झाल्या आहेत,अशी माहिती पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -