घरपालघरकम्युनिस्ट पार्टीचा वाडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

कम्युनिस्ट पार्टीचा वाडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

Subscribe

वाडा तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी बांधव, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांचे विविध प्रश्न, समस्या प्रलंबित असून शासनाकडून या प्रश्नाची सोडवणूक होताना दिसून येत नाही.

वाडा तालुक्यातील गोरगरीब, आदिवासी बांधव, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांचे विविध प्रश्न, समस्या प्रलंबित असून शासनाकडून या प्रश्नाची सोडवणूक होताना दिसून येत नाही. शासन दरबारी हेलपाटे मारूनसुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. याकरता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी वाडा तालुका कमिटी, किसान सभा जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआयच्या वतीने वाडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माकपच्या शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांची भेट घेऊन चर्चा केली. वन विभागाच्या गहाळ झालेल्या फाईल्सची पूर्तता करा. वनपट्टेमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट एफडीसीएममार्फत सुरू असलेली वृक्षतोड व झाड छाटणी बंद करा. फॉरेस्ट खात्याकडून गावोगावी रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करा. दावेदार, दावेदारांचे वनट्ट्यांमध्ये चुकलेले सर्वे नंबर, वारसांची नावे इत्यादींमधील चुकीची दुरुस्ती करून घ्या. पंतप्रधान घरकुल योजना यादीमधील गोरगरीब लाभार्थ्यांसाठी सरसकट मंजूर करा.

घरकुलासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी काढून टाका. रोजगार हमी योजनेची कामे विनाविलंब चालू करा. महावितरण कंपनीकडून ग्राहकांवर लादण्यात येणारे भरमसाठ वीज बिल आकारणी बंद करा व वाढीव बिले त्वरित कमी करा. कृषी विभागात असलेल्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा व आपल्या खात्यामार्फत शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा. लघुपाटबंधारेची कामे त्वरित सुरू करा.

- Advertisement -

वाडा शहरातील ४८ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी शंभर गुंठे जागा उपलब्ध झाली असून डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लागेल. येत्या १५ दिवसात चार फिरत्या शौचालयाची सोय होईल. पिण्याच्या स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी वॉटर फिल्टर १ एप्रिलपर्यंत कार्यान्वित होईल.
– डॉ. उद्धव कदम, तहसीलदार वाडा तथा प्रभारी कार्यकारी अधिकारी, नगरपंचायत, वाडा

सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे त्वरित सुरू करा. वाडा कुडूस, शिरीष पाडा येथील मुख्य रस्त्यालगत गटारावरील अतिक्रमण, बांधकामे त्वरित हटवा, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुकसानीबाबत पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. वाडा नगरपंचायत हद्दीमधील अंतर्गत रस्ते गटारी व इतर विविध विकासकामे अंदाज पत्रकाप्रमाणे त्वरित सुरू करा. यासह विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी यावेळी केल्या. चर्चेदरम्यान तहसीलदार कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शिष्टमंडळाची बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मोर्चा मागे घेण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा –

Santosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -