घरपालघरबारा हजाराहून अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

बारा हजाराहून अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

Subscribe

लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये १२ हजार १२४ उमेदवार पोलीस शिपाई लेखीसाठी पात्र असून १०४ उमेदवार चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा कधी घेतली जाणार याची उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बारा हजारहून अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरल्याची माहिती आयुक्तलयाच्या मार्फत देण्यात आली आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी पूर्ण झाल्या नंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये १२ हजार १२४ उमेदवार पोलीस शिपाई लेखीसाठी पात्र असून १०४ उमेदवार चालक पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा कधी घेतली जाणार याची उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे.

मीरा- भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी २ जानेवारी थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आता मुला- मुलींची शारीरिक चाचणी सुद्धा पूर्ण झालेली असून. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच थेट पोलीस भरती होत आहे. एकूण ९९६ पदांच्या जागासाठी ही भरती केली जात आहे. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेल्या ७१ हजार ९५१ अर्जांमध्ये ५९ हजार ८४७ पुरुष व १२ हजार १०४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.भरती करता आलेल्या अर्जदारापैकी एकूण ४९ हजार ४७९ जणांनी भरती प्रक्रियेत त्यांची उपस्थिती दर्शवत मैदानी शारीरिक चाचणी पार पाडली आहे. मैदानी शारीरिक चाचणी मध्ये ३५,९५६ उमेदवार पात्र ठरले आहेत तर १३,५२३ उमेदवार शारीरिक चाचणी परीक्षेत अपात्र ठरले आहेत.

- Advertisement -

भरतीच्या वेळी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास ५० कॅमेरे लावण्यात आले होते. भरती प्रक्रियेचे कंत्राट हे हैदराबादच्या “ई सॉफ्ट” या कंपनीला देण्यात आले होते. भरती प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली, मुख्यालय उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, २१ पोलीस निरिक्षक, ३६ सहाय्यक पोलीस निरिक्षक व उपनिरिक्षक आणि २३१ पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.उमेदवारांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. भरती प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -