घर पालघर शवागार बंद, डायलेसीस केंद्र सुरू

शवागार बंद, डायलेसीस केंद्र सुरू

Subscribe

त्या मागणीवरून आयुक्त संजय काटकर यांनी बंद शवागारातील शीतपेट्या पुन्हा सुरू करता येतील का व शवागार पालिका चालवू शकते का, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या होत्या.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेने मीरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात सुरू केलेले शवागार हे गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शवागारमध्ये असलेल्या शीतपेट्या खराब झाल्या आहेत. या खराब पेट्या बनवणे शक्य नाही. त्यामुळे हे शवागार बंद करून त्या ठिकाणी डायलेसीस केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.  भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पोस्टमार्टेम व शवागार आहे. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी शवागारमधील काही शीतपेट्या बंद असल्यामुळे एका व्यक्तीचे प्रेत रात्रभर रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. या घडलेल्या घटनेमुळे मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील शवागार सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्या मागणीवरून आयुक्त संजय काटकर यांनी बंद शवागारातील शीतपेट्या पुन्हा सुरू करता येतील का व शवागार पालिका चालवू शकते का, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या होत्या.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल तयार करून या शीतपेट्या दुरुस्त करता येणार नाहीत व त्या पुन्हा सुरू करणे शक्य होणार नाही असा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. मीरा- भाईंदर महापालिकेने इंदिरा गांधी रुग्णालयात २००८ मध्ये शवागार सुरू केले होते. त्यामध्ये बसवण्यात आलेल्या शीतपेट्याना पंधरा वर्षे झाली आहेत. तसेच हे शवागार गेली सहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे त्या शितपेट्या खराब झाल्या असून आता त्या पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाहीत, अशी माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.तर मनपा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे शवागार बंद ठेवल्याने त्या शितपेट्या खराब झाल्या आहेत. यामध्ये महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, याची चौकशी करून जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.

- Advertisement -

भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातील शीतपेट्या खराब झाल्यामुळे दुरुस्त करणे शक्य नाही. त्यामुळे तेथील शवागार बंद करण्यात येणार आहे. आरोग्य सेवांसाठी या जागेचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शवागाराच्या जागेत आणखी दहा डायलेलीस यंत्रे बसवण्यात येणार आहेत.

– डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -