घरपालघरआईनेच केली चिमुकलीची हत्या, मुलगी उरुसात हरवल्याचा रचला होता बनाव

आईनेच केली चिमुकलीची हत्या, मुलगी उरुसात हरवल्याचा रचला होता बनाव

Subscribe

जव्हार –एका आईनेच आपल्या पोटच्या तीन वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याची घटना जव्हारमध्ये घडली आहे. मुलगी उरुसात हरवल्याचा बनाव आईने रचला होता. मात्र, चिमुकलीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगातील पोत्यात सापडल्यानंतर खूनाला वाचा फुटल्यानंतर आईला पोलिसांनी अटक केली आहे.

जव्हार शहरातील बायपास रोडवरील अचानक नगर येथे राहणाऱ्या अफसाना उर्फ तारा सुलेमानी (३७) या महिलेने सोमवारी दुपारी स्वतःच्या पोटची चिमुकली सना (३) हिची हत्या केली. त्यानंतर संध्याकाळी तिचा मृतदेह एका प्लस्टिकच्या पोत्यात भरून मृतदेह असलेले पोते तिच्या घरासमोरील बेकरी शेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले.

- Advertisement -

सोमवारी संध्याकाळी अफसाना जव्हार पोलीस ठाण्यात गेली. त्याठिकाणी तिने सना जव्हारच्या ऊरुसात हरवल्याची तक्रार दिली. सना हरवल्याची बातमी समजल्यावर परिसरातील लोकांनी तिचा शोध सुरु केला. तेव्हा सनाचा मृतदेह असलेले पोते सापडून आले. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने कुटुंबिय आणि नागरीक संतापले होते. त्यांना यामागे अफसाना असल्याचा संशय आला. त्यामुळे तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनीही हिसका दाखवल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. अफसानाने चिमुकल्या सनाची हत्या का केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अफसानाला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -