घरपालघरखासदार राजेंद्र गावितांचे पुत्र रोहित यांचे मतदार यादीत दुबार नाव

खासदार राजेंद्र गावितांचे पुत्र रोहित यांचे मतदार यादीत दुबार नाव

Subscribe

डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या तिकिटावर उभे असलेले खासदार राजेंद्र गावीत यांचे चिरंजीव रोहित गावीत यांची पालघर आणि ठाणे मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी झाली असल्याचे समोर आले आहे.

डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या तिकिटावर उभे असलेले खासदार राजेंद्र गावीत यांचे चिरंजीव रोहित गावीत यांची पालघर आणि ठाणे मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी झाली असल्याचे समोर आले आहे. मतदार यादीमध्ये असलेल्या दोन नोंदणीमुळे निवडणूक लढवण्यावर कोणताही परिणाम होणार नसला तरीही खासदार राजेंद्र गावीत यांच्याकडूनच नियमांचा भंग केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रोहित गावित पालघर जिल्हा परिषदेच्या वणई गटातून पोटनिवडणुकीत लढवत आहेत. स्थानिक उमेदवारांना डावलून रोहित गावितांना उमेदवारी देण्यात आल्याने आधीच शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. गावितांनी रोहितला मैदानात उतरवून आपला राजकीय वारसदार तयार केल्याचीही चर्चा सुरु आहे. त्यातच रोहित यांच्या दुबार मतदान नोंदणीचा वादाचा मुद्दा समोर आला आहे.

गावित आपल्या कुटुंबासह मीरा रोड येथे राहतात. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर मतदार यादीत रोहित गावीत यांचे नाव नोंदवण्यात आले असून त्यांना मतदान ओळखपत्रही देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आता वणई गटातून निवडणुक लढवत असलेल्या रोहित यांनी आपले नाव पालघर जिल्ह्यात नोंदवल्याचे उजेडात आले आहे. निवडणूक नियमानुसार नव्याने मतदार नोंदणी करताना जुनी मतदार नोंदणी रद्द करणे करणे बंधनकारक आहे. तसेच जुन्या मतदार यादीतील तपशील देणे आवश्यक असतो. मात्र खासदार गावीत यांच्या चिरंजीवांचे नाव अजूनही दोन मतदार याद्यांमध्ये झळकत असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

- Advertisement -

रोहित गावित यांना पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आणण्यासाठीच राजेंद्र गावीतांनी त्यांचे नाव पालघरमध्ये नोंदवल्याचे त्यांच्या उमेदवारीवरून आता स्पष्ट झाले आहे. पालघरमधील नोंदवताना रोहित गावित कमारे येथील एका भाड्याच्या घरात वास्तव्य करत असल्याचा दाखला दिल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खासदार राजेंद्र गावित गेल्या अनेक वर्षांपासून पालघर शहरातील भाड्याच्या बंगल्यात निवास करत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीच हे तंत्र अवलंबवल्याचे उजेडात आले आहे.

अनेक मतदार याद्यांमध्ये नावे दुबार किंवा वेगवेगळ्या याद्यांमध्ये एकच मतदाराचे नाव असल्याचे अनेक प्रकार पहावयास मिळतात. निवडणूक आयोगाकडून दुबार नावे कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण सुजाण मतदारांनी स्वतःहून एका ठिकाणाहून नाव कमी करणे अपेक्षित मानले जाते. असे असताना खासदारांसारख्या सर्वोच्च लोकप्रतिनिधीकडून निव्वळ स्वतःच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संतापही मतदारांमध्ये व्यक्त केला जात आहे. रोहित यांचे मीरा रोड येथील नाव कमी करण्यासाठी अर्ज केल्याचे सांगत खासदार गावितांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्यात येतंय, जयंत पाटील यांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -