घरपालघरमीरा भाईंदरमध्ये रस्ते, कठड्यांची महापालिकेतर्फे साफसफाई मोहीम

मीरा भाईंदरमध्ये रस्ते, कठड्यांची महापालिकेतर्फे साफसफाई मोहीम

Subscribe

मिरा भाईंदर महापालिका हद्दीत स्वच्छ भारत योजनेतून पालिका हद्दीतील रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे व रस्ते हे स्वच्छता साफसफाई करण्यासाठी पालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतील आहे

मिरा भाईंदर महापालिका हद्दीत स्वच्छ भारत योजनेतून पालिका हद्दीतील रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे व रस्ते हे स्वच्छता साफसफाई करण्यासाठी पालिकेने एक विशेष मोहीम हाती घेतील आहे. यामध्ये पालिका हद्दीत काढलेल्या रंगीत जाहिराती यांच्यावर पडलेली धूळ व घाण साफ करण्यासाठी पालिका अग्निशमन विभागाच्या गाड्याच्या मदतीने बुधवारी शहरात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. यात पालिकेने रंगरंगोटी करून सजवलेले कठडे पाणी मारून धुतले केले. पालिका परिसरात स्वच्छतेच्या दिशेने कृतीशील पावले टाकण्यास ‘स्वच्छ भारत’मुळे चालना मिळते, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यामुळेच या योजनेच्या विविध निकषात उत्कृष्ट कामगिरी करणारी शहरे दखलपात्र ठरत आहेत. त्याचाच भाग म्हणून शहरातही अनेक उपक्रम राबवत आता धुळीने माखलेले रस्ते, कठडे, भिंती यांची धुलाई अग्निशमन विभागाच्या गाड्याच्या मदतीने शहरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

- Advertisement -

शहरात ज्या ठिकाणी भिंतीवर सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक व वर्दळ असते, त्या भागात पालिकेमार्फत दर १५ दिवसांनी एकदा त्या ठिकाणी पालिकेच्या सिव्हरेज प्लांटमधील पाण्याने धुलाई व साफसफाई केली जाते. तसेच नागरिकांना आवाहन आहे की, पानसुपारी खाऊन थुंकू नका, स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांचीसुद्धा आहे.
– दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका

 

- Advertisement -

शहरांची स्वच्छता ही केवळ स्थानिक प्रशासनाची जबाबदारी नसून तिथे राहणाऱ्या सर्व नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे याची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि एकूणच जागरूकता आणण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम पालिकेमार्फत राबवले जात आहेत. ओला आणि कोरडा कचरा वेगळा ठेण्यापासून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करण्यापर्यंत अनेक बाबी नागरिकांना पुन: पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे. आपण राहतो तो परिसर आणि ते शहर स्वच्छ असायालाच हवे आणि त्यासाठी आपण योगदानही द्यायला हवे, याचे भान प्रत्येकाला यायला हवे. ‘स्वच्छ’च्या पाहणीत स्थानिकांचे मत विचारत घेतले जात असले, तरी याबाबत लोकशिक्षण कितपत आहे हे पाहायला हवे. स्थानिक स्वयंसेवी भावी संस्था आणि शहरांत मोठ्या प्रमाणावर असलेल्या सोसायट्या यांची अधिक चांगल्या प्रकारे मदत घेता येऊ शकते. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया, शाश्वत उपाय आदींसाठी नागरिकांनी स्थानिक पातळीवरून प्रयत्न करणाऱ्यांची दखल घ्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निकषांची कागदोपत्री पूर्तता करण्यावर भर देण्याऐवजी कृतीशीलतेवर भर देण्यास पालिकेनी सुरुवात केलेली आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -