घरपालघरमीरा भाईंदरमधील खाड्यांच्या प्रदूषणास महापालिका जबाबदार

मीरा भाईंदरमधील खाड्यांच्या प्रदूषणास महापालिका जबाबदार

Subscribe

मीरा भाईंदर महापालिकेने औद्योगिक आणि निवासी क्षेत्रातील प्रदूषित सांडपाणी थेट खाडी, समुद्रात सोडून प्रचंड जल्रदूषण करून पर्यावरणाचा ऱ्हास चालवला आहे. तसे असताना देखील ठाण्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेने औद्योगिक आणि निवासी क्षेत्रातील प्रदूषित सांडपाणी थेट खाडी, समुद्रात सोडून प्रचंड जल्रदूषण करून पर्यावरणाचा ऱ्हास चालवला आहे. तसे असताना देखील ठाण्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रदुषणामुळे येथील पारंपरिक मासेमारी नष्ट झाली आहे. तर मीठ व्यवसायही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मीरा भाईंदर शहराचे झपाट्याने औद्योगिकरण व नंतर शहरीकरण झाले. काशीमीरा, पेणकरपाडा, मीरागाव एमआयडीसी, भाईंदर पूर्व व मीरा रोडच्या अनेक भागात लहान-मोठे उद्योग आहेत. यात प्रदूषणकारी उद्योग आहेत. त्यातून निघणाऱ्या औद्योगिक कचऱ्याची विल्हेवाट केली जात नाही. त्याच प्रमाणे येथून निघणारे घातक रासायनिक सांडपाणी देखील कायद्याने प्रक्रिया करणे बंधनकारक असून देखील त्याचे पालन केले जात नाही. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी थेट पालिकेच्या गटारात, नाल्यात व त्या मार्फत थेट खाडी पात्रात सोडले जाते.

उद्योगातून सोडले जाणारे रासायनिक प्रदूषित घटक घटक आहेत. तसेच महापालिकेने आमच्या नैसर्गिक खाड्यांमध्ये बेकायदेशीर गटारे बांधून सांडपाणी, मलमूत्र थेट सोडल्याने त्या प्रदूषित झाल्या आहेत. मासळी नष्ट होऊन मासेमारी बंदच झाली आहे. तर मीठ व्यवसाय सुद्धा अखेरच्या घटका मोजत आहे. महापालिकेने चालवलेल्या या जलप्रदूषणास प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार आहे. त्यांच्या कडूनच सातत्याने जलप्रदूषणा विरोधात कारवाई केली जात नाही. याबाबत आपण अनेक तक्रारी केल्या. परंतु जलप्रदूषणापेक्षा भ्रष्टाचाराचे प्रदूषण वरचढ ठरले आहे.
– अशोक बळवंत पाटील, अध्यक्ष, शिलोत्री संघ

- Advertisement -

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घटक सांडपाण्या सह रहिवासी क्षेत्रांतील सांडपाणी देखील महापालिकेच्या गटार नाल्यांद्वारे खाडी पात्रात सोडले जात आहे. पालिकेच्या बहुतांश मलनिःस्सारण प्रकल्पा तून सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट विविध खाड्यांमध्ये सोडले जात आहे. पालिकेने भूमिगत गटार योजना आणि मलनिःस्सारण प्रकल्पच्या नावाखाली शेकडो कोटींचा खर्च केला आहे. ठेके दिले आहेत. परंतु सांडपाण्याचा पुनर्वापर तर नाहीच प्रक्रिया न करताच सांडपाणी खाडी पात्रात बेकायदेशीरपणे सोडले जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक तसेच निवासी भागातील सांडपाणी, मलमूत्र आदी बेकायदेशीरपणे शहरातील जाफरी खाडी, घोडबंदर खाडी, वरसावे खाडी, नवघर खाडी, जय आंबे नगर खाडी, नाझरेथ खाडी, वसई खाडी, मुर्धा खाडी, राई खाडी, मोरवा खाडी, उत्तन नवी खाडी तसेच समुद्रात सोडले जात आहे. यामुळे या खाड्यांचे पाणी हे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यातूनच कचरा गाळ वाहून येत असल्याने खाडी पात्र अरुंद होत चालले आहेत. रासायनिक व सांडपाण्या मुळे प्रदूषित झालेल्या या खाड्यामधील विविध जातीची मासळी नष्ट झालेली आहे. त्यामुळे मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय असणाऱ्या आगरी, कोळी यांचा मासेमारीचा व्यवसायाच ह्या प्रदूषित पाण्या मुळे नष्ट झालेला आहे.

- Advertisement -

जलप्रदूषण कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने खाड्यात रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या महापालिकेसह संबंधित उद्योगांवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली पाहिजे. मलनिःस्सारण प्रकल्प न चालवता दूषित सांडपाणी सोडणे. त्यासाठी कच्चे-पक्के नाले बांधले त्या अधिकारी ठेकेदारांसुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
– स्टॅलिन दयानंद, संचालक वनशक्ती

मासेमारी सह येथील पारंपरिक मीठ व्यवसायावर देखील विपरीत परिणाम झालेला आहे. सांडपाण्या मुळे तर अनेकांनी मीठ पिकवणेच सोडून दिले आहे. तर काहींनी उच्चतम भरतीच्या वेळी पाणी घेणे किंवा बोअर मारणे असे पर्याय तयार करून मीठ पिकवणे सुरु ठेवले आहे. शहरातील जल प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी ईश्वर ठाकरे आणि सुवर्णा गायकवाड यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा –

…नाहीतर गोळ्या घालीन, शेतकरी नेते डॉ. अजित नवलेंना खुनाची धमकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -