Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरमहापालिकेची एकल प्लास्टिकविरोधात कारवाई

महापालिकेची एकल प्लास्टिकविरोधात कारवाई

Subscribe

सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे आणि उपायुक्त चारुशिला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली.

वसईः वसई-विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘एकल प्लास्टिकविरोधातील मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. गुरुवारी प्रभाग समिती ‘जीमधील एका व्यापारी गाळ्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून व्यापारी शैलेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे आणि उपायुक्त चारुशिला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली.

महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार, राज्यात एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे. त्यानुसार, व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांना सदर बंदीबाबत कल्पना देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबात सूचना वसई-विरार शहर महानगरपालिकेने केलेल्या आहेत. त्यानंतरही शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकॉलची उत्पादने विक्रीसाठी अथवा वापर केला जात आहे. याविरोधात महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग वेळोवेळी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल उत्पादन जप्ती व दंडात्मक कारवाई करत असला तरी सातत्याने शहरातील व्यापारी, दुकानदार एकल प्लास्टिक पिशव्यांचे वितरण व विक्री करत असल्याने तसेच फेरीवाले फळभाज्या विक्रीकरता कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आलेले आहे.

- Advertisement -

आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे व उपायुक्त चारुशिला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी दिवाळी अगोदर ‘एकल प्लास्टिकविरोधात अखंड मोहीम राबवलेली होती. सातत्यपूर्ण आणि सलग महिनाभर चाललेल्या या मोहिमेत कित्येक टन प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला होता. महापालिकेच्या या कारवाईमुळे एकल प्लास्टिक वितरण आणि विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना जरब बसली होती. मात्र, पुन्हा बाजारात एकल प्लास्टिकचा वापर वाढला असल्याने महापालिकेने ही मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुकदेव दरवेशी यांनी दिली.
दरम्यान, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलची उत्पादने यांची साठवणूक, विक्री व वापर करू नये. तसे आढळल्यास व्यापारी, दुकानदार व फेरीवाले यांच्याविरोधात अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -