घरपालघरनगरपरिषद पथकावर कोयत्याने हल्ला

नगरपरिषद पथकावर कोयत्याने हल्ला

Subscribe

पालघर शहरातील अनधिकृत बांधकामांना काही नगरसेवकांचा पाठींबा असल्यामुळे या तरुणाने हे धाडस केल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

पालघर: पालघर शहरातील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम जोरात सुरु झाली असून पालघर शहरातील माहीम रोड वरील सत्तरगाला परिसरातील काही बंगल्याचे कुंपण हे रस्त्यावर असल्याने नगरपरिषदेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ते तोडले.त्यावेळी बंगल्यातील एक तरुणाने हा पथकातील जेसीबी चालकावर धावून येऊन जेसीबी चालकावर कोयता उगारला. त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हवालदार रवींद्र गोरे यांनी त्या तरुणास पाठीमागून पकडून जेसीबी चालकावरील होणारा जीवघेणा हल्ला अडवून जेरबंद केले.पालघर नगर पालिका क्षेत्रात नगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकावर असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पालघर शहरातील अनधिकृत बांधकामांना काही नगरसेवकांचा पाठींबा असल्यामुळे या तरुणाने हे धाडस केल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

कोट/-
आम्ही त्या तरुणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत.
–पंकज पाटील-पवार,मुख्यधिकारी,पालघर नगर परिषद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -