घर पालघर महापालिकेचे मैदान खेळाडूंसाठी अजूनही बंदच

महापालिकेचे मैदान खेळाडूंसाठी अजूनही बंदच

Subscribe

मैदान उपलब्ध करून दिल्यानंतर मैदानावर एका संस्थेने स्टेडियम उभारले आहे. २ जून रोजी भव्य असे क्रिकेट सामने होणार होते.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेचे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे शहरातील सर्वात मोठे मैदान आहे. या मैदानावर गेल्या दोन महिन्यांपूर्वी क्रिकेटचे सामने होणार होते. त्यामुळे एका संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने मैदानावर क्रिकेट सामन्यासाठी स्टेडियम उभारले आहे. त्यामुळे हे मैदान सर्वसामान्य खेळाडू , तरुण यांना खेळण्यासाठी गेल्या दोन – महिन्यांहून बंद ठेवण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत मैदानावर कोणतेही क्रिकेट सामने झाले नाहीत. तसेच मैदानही खेळण्यासाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे शहरातील खेळाडूंची गैरसोय होत आहे. शहरातील अनेक खेळाडूंनी संताप व्यक्त केला असून मैदान लवकर खुले करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. मैदान उपलब्ध करून दिल्यानंतर मैदानावर एका संस्थेने स्टेडियम उभारले आहे. २ जून रोजी भव्य असे क्रिकेट सामने होणार होते.

या सामन्यासाठी भारतातील व परदेशातील नामांकित खेळाडू उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु हे क्रिकेट सामने काही कारणास्तव अद्यापपर्यंत होऊ शकले नाहीत. त्यामुळे मैदान बंदच ठेवण्यात आलेले आहे. हे क्रिकेट सामने सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे मैदान कधी खुले होणार हे सांगता येत नाही. शहरात दुसरे मोठे मैदान नसल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. खेळाडूंची गैरसोय होत असताना महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. हे मैदान लवकरात लवकर खुले करण्यात यावे अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -