घर पालघर पालिकेचे मिशन वसई- विरार रेल्वे उड्डाणपूल लवकरच

पालिकेचे मिशन वसई- विरार रेल्वे उड्डाणपूल लवकरच

Subscribe

त्यातून विरार शहरात विराट नगर, नालासोपारा शहरात ओसवाल नगरी आणि अलकापुरी, नवघर-माणिकपूर शहरातील उमेळमानचा समावेश आहे. त्याचबरोबर वसई रोड येथे नवा रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे.

वसईः वसई -विरारमधील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वसई -विरार महापालिकेने नव्या पाच रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारच्या सेतू भारतम् या योजनेतून निधी मिळवण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सध्या वसई-विरारमधील शहरांना पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे नायगाव, वसई अंबाडी, नालासोपारा आणि विरार असे चार रेल्वे उड्डाणपूल आहेत. प्रचंड नागरीकरण झाल्याने वाहनांची संख्याही वाढली आहे. सध्या वाहतुकीसाठी शहरात असलेले रस्ते अपुरे पडू लागल्याने वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुटून वाहतूक सुरळित व्हावी, यासाठी महापालिका विविध ठिकाणी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे रस्ते तयार करणार आहे. यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करून शहरात पूर्व-पश्चिमेला जोडणारे पाच रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच रेल्वे उड्डाणपुलांना निधी मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या सेतू भारतम् आणि एमएमआरडीएकडे पाठवण्यात आला आहे. पाच रेल्वे उड्डाणपुलांसाठी अडीचशे कोटींहून अधिक रुपये खर्च येणार असून त्यातून विरार शहरात विराट नगर, नालासोपारा शहरात ओसवाल नगरी आणि अलकापुरी, नवघर-माणिकपूर शहरातील उमेळमानचा समावेश आहे. त्याचबरोबर वसई रोड येथे नवा रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा महापालिकेचा मानस आहे.

 

- Advertisement -

जुन्या अंबाडी पुलाचा समावेश

वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंबाडी पूल १४० वर्षे जुना पूल आहे. त्यामुळे तो जीर्ण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. सध्या त्याचा वापर केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी करण्यात येतो. नव्याने प्रस्तावित केलेल्या पुलांमध्ये जुन्या अंबाडी पुलाचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -