घरपालघरबेकायदा प्लांटमधून महापालिकेची पाणी चोरी

बेकायदा प्लांटमधून महापालिकेची पाणी चोरी

Subscribe

पाणी शुद्ध असल्याच्या नावाखाली विकून लाखो रुपये कमाई केली जात असल्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

मीरा भाईंदर महापालिकेच्या चेना गावात अवैध सुरु असलेल्या पाण्याच्या प्लांटमध्ये महापालिकेचे पाणी चोरी केले जात असल्याचे उजेडात आले. हेच पाणी शुद्ध असल्याच्या नावाखाली विकून लाखो रुपये कमाई केली जात असल्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. काशीमिरा परिसरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली अनेक बेकायदा प्लांट सुरू आहेत. या प्लांटसाठी बोअरिंगचे पाणी वापरले जाते. तर अनेक प्लांट महापालिकेच्या नळकनेक्शनमधून वीज मोटर लावून पाणी चोरत असल्याचे उजेडात आले आहे. हेच पाणी बाटलीत बंद करून शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली विकले जात आहे. वीस लिटरसाठी तब्बल तीस ते चाळीस रुपये आकारले जातात. पाण्याची अशी उघड चोरी होत असताना महापालिका प्रशासन कानाडोळा करीत असल्याने संशयाने पाहिले जात आहे.

अशा प्लांटला महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा केला जात नाही आहे. मात्र, हे पाणी या प्लांटला कशा प्रकारे प्राप्त झाले यांची चौकशी करून त्या प्लांटवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– दीपक खांबित, कार्यकारी, अभियंता, पाणीपुरवठा विभाग

- Advertisement -

महापालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडुन पाणी पुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ द. ल.ली पाणी पुरवठा केला जातो. तर एम.आय.डी.सी. (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडुन ११५ द.ल.ली पाणी पुरवठा होतो. परंतु यात देखील गेल्या काही दिवसापासून तात्पुरत्या स्वरूपात कपात करण्यात आल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यात बेकायदा प्लांट महापालिकेचे पाणी चोरत असल्याने पाणी टंचाईत भर पडू लागली आहे.

दरम्यान, शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोअरिंग आणि टँकरचे पाणी बाटली बंद करून विकून शहरवासियांच्या जिवीताशी खेळणार्‍या प्लांटविरोधात महापालिकेसह अन्न व औषध प्रशासन विभागही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. शुद्धतेच्या नावाखाली विकल्या जाणार्‍या पाण्याची गुणवत्ता तपासली जात नसल्याने लोकांची फसवणुक खुलेआम सुरुच आहे. त्यांना कोणी बोरिंग तर कोणी पालिकेच्या नळ कनेक्शन मधून घेऊन थेट मोटारीद्वारे पाणी खेचून त्याचे स्टोरेज करून त्याच पाण्यावर प्रक्रिया करून त्यालाच बाटलीबंद पाणी म्हणून शहरात ४० ते ५० रुपयाला बाटली विकली जाते त्यात अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे तर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते त्यातून होणारे टीडीएस (पाण्यामधील क्लोरीनची मात्रा) गुणवत्ता तपासली जात नाही. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा तपासले जात नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

सरकारने केवळ २ उद्योगपतींसाठी कृषी कायदे केले; लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -