घरपालघरत्या व्यक्तीची हत्या की आत्महत्या ?

त्या व्यक्तीची हत्या की आत्महत्या ?

Subscribe

मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित केले. या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.

डहाणू : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणार्‍या धावत्या स्लीपर कोच बसमध्ये एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता.तसेच त्याचा मृत्यू देखील झाला होता.या इसमाची नेमकी हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घाटकोपर येथून निघालेली ही बस राजस्थानमधील उदयपूर येथे जात असताना चारोटी टोलनाक्याजवळ ही घटना उघडकीस आली. घोडबंदरला बसमध्ये बसलेल्या एका अनोळखी प्रवाशाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसल्याने सहप्रवासी आणि बस चालकाने त्याला कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित केले. या इसमाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.

लक्झरीमधून मृतदेह उतरवून कासा उप जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला. मृतदेहाची झाडाझडती घेतली असता, त्या इसमाचे आधारकार्ड सापडले असून त्याचे नाव रामनाथ असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. मयताच्या हातात अनेक नवीन ब्लेड सापडले असून, त्या ब्लेडने त्याने स्वतःच्या छाती वर, पोटावर व गळ्यावर कापून घेऊन आत्महत्या केली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे. वाहन चालकाने सांगितले की, मयत व्यक्ती हा घोडबंदरला या बसमध्ये चढला. स्वतः एकट्यासाठी जागा पाहिजे असे सांगत होता. प्रवासी बस चारोटी येथे काही कामानिमित्त थांबली असता, प्रवासी बस बाहेर येत असताना खाली रक्त पडल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आल्यावर त्याने ते चालकाच्या निदर्शनास आणून दिल्यावर ही घटना उघडकीस आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -