Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर पालघर पावसाच्या तोंडावर नाल्याचे काम

पावसाच्या तोंडावर नाल्याचे काम

Subscribe

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र १४ मधील मिनाक्षीनगर येथे पावसाच्या तोंडावरच नाल्याचे काम सुरू केल्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झाला आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र १४ मधील मिनाक्षीनगर येथे पावसाच्या तोंडावरच नाल्याचे काम सुरू केल्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत असून मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या काशीमिरा भागातील प्रभाग क्र. १४ मधील मीनाक्षी नगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने २० मे नंतर मोठ्या नाल्याचे बांधकाम सुरू केले आहे. मीनाक्षी नगर भागात ३ ते ४ हजार रहिवाशी वास्तव करत आहेत. नाल्याचे काम सुरू केले त्यावेळेस त्यांना पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. पूर्ण नियोजन करून काम सुरू करणे आवश्यक होते. परंतु कोणतेही नियोजन न करता नाल्याचे काम सुरू केल्यामुळे तेथील रहिवाशांना येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

विशेष म्हणजे महापौर जोत्सना हसनाळे या प्रभागातूनच निवडून आलेल्या आहेत. महापौरांच्या प्रभागातच नागरिकांचे हाल होत असतील तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल, असा तेथील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मीनाक्षी नगर भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी प्रमाणात भरते. त्यामुळे रहिवाशांचे आतोनात हाल होत असतात. त्यातून नागरीकांना दिलासा मिळावा यासाठी या भागातून पाणी जाण्यासाठी मोठा नाला बनवला जात आहे. परंतु हा नाला बनवताना महापालिकेने नियोजन न करता व पावसाळाच्या तोंडावर नाल्याचे काम सुरू केले आहे.

- Advertisement -

नाल्याचे काम सुरु झाल्याने ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने रहिवाशांना जीव धोक्यात घालून जुन्या नाल्यावर टाकलेल्या भीमवरून ये-जा करावी लागत आहे. त्या भीमवरून जाताना दोन दिवसांपूर्वी एक सहा वर्षाची मुलगी पडल्याचे तेथील रहिवाशी सांगत आहेत. रहिवाशी, गरोदर महिला, वरिष्ठ नागरिक यांना आपला जीव धोक्यात घालून त्या रस्त्याने जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या नाल्याचे काम लवकर पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्हाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

हेही वाचा –

सर्व कोविड रुग्णांच्या बिलांचे ऑडीट करा; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -