मनोज तांबे, विरार : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र म्हणून नालासोपारा विधानसभा क्षेत्राची नोंद होते. मात्र पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये नालासोपारा क्ष्रेत्राचा मतदानाचा टक्का घसरला आहे. पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभांमधील नालासोपारा विधानसभेमध्ये ५७.१ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.
पालघर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये जिल्ह्यात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे सहा विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये एकूण २२ लाख ९२ हजार ६६ मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात बुधवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. १२८ डहाणू विधानसभा मतदार संघात ७२.५ टक्के तर १२९ विक्रमगड विधानसभा मतदार संघात ७७.७५ टक्के मतदान झाले आणि १३० पालघर विधानसभा मतदार संघात ७१.०७ तर १३१ बोईसर विधानसभा मतदार संघात ६६.१७ झाले तर वसईत विधानसभा मतदार संघात ६०.४६ टक्के तर नालासोपार्यात ५७.१ टक्के मतदान झाले. या सर्व विधानसभा मतदार संघात नालासोपारा मतदार संघात मताधिक्य घटले असल्याचे दिसून आले आहे.
लोकसभा सार्वत्रिक २०१९ च्या निवडणुकीध्ये नालासोपारा मतदार संघात 51.83% टक्के मतदान झाले होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर सन २०१९ च्या विधानसभा निडवणुकीच्या तुलनेत सन २०२४ नालासोपारा विधानसभा मतदार संघात ५. २७ टक्क्याने मतदानात वाढ झाली आहे. मात्र सध्या २३ नोव्हेंबर रोजी लागणार्या विधानसभा निकालाकडे सर्व वसई तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नालासोपारा विधानसभा मतदार संघात अटीतटीची त्रिकोणी लढत असल्याचे पाहायला मिळत आहे.