घरपालघरपालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची गरज

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांची गरज

Subscribe

नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना लसीसाठी पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून मनोर येथे यावे लागत आहे. त्यामुळे दुर्वेस, ढेकाळे हालोली येथे लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र पालघर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना लसीसाठी पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करून मनोर येथे यावे लागत आहे. त्यामुळे दुर्वेस, ढेकाळे हालोली येथे लसीकरण केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. कुडे, ढेकाळे सावरा ऐबूर ऐरंबी, दुर्वेस या भागात बरीचशी गावे व पाडे आहेत. ही सर्व गावे मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत आहेत. या भागातील नागरिकांना लस घ्यायची झाल्यास मनोर येथे यावे लागत आहे. मनोर येथे यायचे म्हणजे डमडम रिक्षा अथवा बसने प्रवास करावा लागत असून त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस ५० ते ६० रुपये खर्च करून लसीकरण केंद्र गाठावे लागत आहे त्यामुळे ही लसीकरण केंद्रे गावांच्या जवळपास असलेल्या उपकेंद्रावर सुरू करावीत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील भाग व ग्रामीण भाग विस्तारलेला आहे. गाव पाडे हे लांब लांब आहेत. कुडे, हालोली, बोट, बेहरी पोंडा ढेकाळे येथील नागरिकांना लसीकरणासाठी मनोर येथे जाणे अडचणीचे असून ढेकाळे दुर्वेस हालोली येथे नव्याने लसीकरण केंद्रे हवीत जेणेकरून लोकांची सोय होईल व कोणीही लसीपासून वंचित राहणार नाही.
– राजेश पाटली, आमदार

- Advertisement -

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेण्याची प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. मात्र जवळपास लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुडे ते मनोर हे चौदा किलोमीटरचे अंतर आहे. त्याचप्रमाणे दुर्वेस सावरा एम्बुर व त्या परिसरातील गावातील लोकांना सतरा ते अठरा किलोमीटरचा प्रवास करून लसीकरण केंद्रावर यावे लागत आहे. इतक्या लांब जायचे कसे, असा प्रश्न तिथल्या सामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या एसटी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात सुरू नसल्यामुळे नागरिकांना टमटम रिक्षाचा आसरा घ्यावा लागत आहे. आपल्या घरापासून मनोरपर्यंत यायचे झाल्यास ७० ते ८० रुपये खर्च आहे. त्याचबरोबरीने वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बरेच जण लसीकरण केंद्रावर जायला उत्सुक नसल्याचे माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण सातवी यांनी सांगितले.

ग्रामीण भागात लसीबाबत अपप्रचार आहे. ती जर लवकर उपलब्ध झाली तर लगेच घेतील. लसीकरण केंद्रावर एकदा येऊन परत गेली तर ती लस पुन्हा घेतील याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी लसीकरण केंद्र प्रशासनाने सुरू करावीत.
– वसंत चव्हाण, जिल्हा प्रमुख, शिवसेना

- Advertisement -

सातीवली दुर्वेश या भागात आरोग्य खात्याची उपकेंद्र आहेत. दुर्वेश येथे लसीकरण केंद्र सुरू केल्यास सावरा एम्बुर हेरंब आजूबाजूस असलेल्या २५ ते ३० पाड्यातील नागरिकांना हे केंद्र जवळ पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल व त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होणार नाही. त्यामुळे दुर्वेस, ढेकाळे हालोली येथे लसीकरण केंद्रे सुरू करावीत जेणेकरून गाव पाड्यातील नागरिक या लसीकरण मोहिमेत सहभागी होतील, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनोरला लसीकरण केंद्र असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे व आर्थिक भुर्दंडही त्यांना सोसावा लागत आहे. प्रशासनाने जवळपास लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक विचार करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने लसीकरण केंद्रे उभारावीत.
– प्रवीण सातवी, माजी पंचायत समिती सदस्य

हेही वाचा –

लसीकरणाच्या जबाबदारीपासून राज्य सरकार पळ काढतंय, दरेकरांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -