घरपालघरसफाळे रेल्वे स्थानकात सबवे उभारण्याची गरज

सफाळे रेल्वे स्थानकात सबवे उभारण्याची गरज

Subscribe

यासाठी सबवेची उभारणी करून मगच फाटक कायमचे बंद करण्याची मागणी गुरुवारी सफाळे विकास कृती समितीने निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे केली.

सफाळे : सफाळे पूर्व पश्चिम भागाला जोडणार्‍या सरतोडी भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पश्चिमेकडील प्रस्ताविक जागेअभावी संथगतीने सुरू होते. मात्र उड्डाणपुलाच्या उभारणीतील तिढा सुटल्याने आता रात्रंदिवस युद्धपातळीवर काम सुरू असून एप्रिल महिन्यात पूर्ण होईल अशी शक्यता आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे प्रशासनाकडून फाटक क्रमांक ४२ कायमचे बंद केले जाणार असल्याचे संकेत असून पायी प्रवास करणार्‍या नागरिकांचे हाल होतील. यासाठी सबवेची उभारणी करून मगच फाटक कायमचे बंद करण्याची मागणी गुरुवारी सफाळे विकास कृती समितीने निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे केली.

यावेळी समितीचे अध्यक्ष सिकंदर शेख, उपाध्यक्ष राजेश म्हात्रे आणि नचिकेत पाटील, सचिव स्वप्निल तरे, सहसचिव संतोष घरत व अमोद जाधव, तुषार गुंडे त्यांच्या समवेत सफाळे, माकणे, वेढी-मांजूर्ली, कांद्रेभुरे, विराथन बुद्रुक, मथाने, भादवे, तेंभिखोडावे, उसरणी, कर्दळ, जलसार, डोंगरे, नवघर- घाटीम, आगरवाडी, एडवण, मांडे अशा ग्रामपंचायतीचे सरपंच यावेळी उपस्थित होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी समितीची दाखल घेत डीएफसीसीला सबवे उभारण्यासाठी तत्काळ पत्रव्यवहार करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. सफाळे पश्चिमेकडील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मागील ६ वर्षांपासून सुरू असून बाधित शेतकर्‍यांच्या जागा प्रस्तावित करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पूर्व व पश्चिम भागात जोडणारा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम रखडले होते. मात्र आता प्रस्तावित जागा उपलब्ध झाल्याने पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून एप्रिल महिन्यात काम पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उड्डाणपूल हे पूर्व पश्चिमेकडील गावांना जोडणारा असून अनेक गावांतील वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सफाळे बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -