घर पालघर नवे आयुक्त,नवी पालिका,नवीन आव्हाने

नवे आयुक्त,नवी पालिका,नवीन आव्हाने

Subscribe

भाईंदर पश्चिम येथील पशू -पक्षी उपचार केंद्र, अग्निशमन केंद्र व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, बंदरवाडी आरोग्य केंद्र , इंदिरा गांधी रुग्णालयास भेट देऊन आयुक्तांनी कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेचे नवनियुक्त पालिका आयुक्त संजय काटकर यांनी पदभार घेताच महानगरपालिका हद्दीतील दहिसर चेकनाका ते गोल्डन नेस्ट, भाईंदर पश्चिम, भाईंदर पूर्वेकडील अंतर्गत रस्ते व इतर ठिकाणी पाहणी दौरा केला. या पाहणी दौर्‍याच्या वेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त व कर्मचारी उपस्थित होते. सदरील पाहणी दरम्यान पालिका आयुक्तांनी दहिसर चेकनाका येथून सुरुवात करत गोल्डन नेस्ट ,भाईंदर आणि मीरारोड भागातील अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या आहेत. त्याचबरोबर पाहणी करताना आयुक्त यांनी महाजनवाडी तरण तलावास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करून मार्गदर्शक सूचना संबंधित अधिकार्‍यांस दिल्या. भाईंदर पश्चिम येथील पशू -पक्षी उपचार केंद्र, अग्निशमन केंद्र व सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, बंदरवाडी आरोग्य केंद्र , इंदिरा गांधी रुग्णालयास भेट देऊन आयुक्तांनी कामकाजाची माहिती घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

 

- Advertisement -

अभ्यासिकेस अनपेक्षित भेट

यावेळी आयुक्त काटकर यांनी भाईंदर पश्चिम उद्यानातील अभ्यासिकेस अनपेक्षित भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच सालासार हनुमान उद्यान, सुभाषचंद्र बोस मैदान, आरक्षण क्र. २६९ उद्यान व रामदेव पार्क उद्यानास भेट देऊन आयुक्तांनी उद्यानाच्या देखभालीबाबत माहिती घेऊन झाडांची छाटणी व उद्यानात नियमित स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -