HomeपालघरNew Year: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केळवे बीच सज्ज

New Year: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केळवे बीच सज्ज

Subscribe

केळवे बीचला शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने काही प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

सफाळे: ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

केळवारोड स्थानकाच्या पश्चिम किनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. आज मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ या वर्षांचा शेवटचा दिवस असून दुसर्‍या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या नवर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी गोची झाली आहे. मात्र त्यातही आनंदाचा पार हा उंचावलेलाच आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागांतूनही पर्यटक प्रचंड संख्येने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीच परिसरात छोटे-मोठे असे ६० ते ७० रिसॉर्टस असून विविध प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज पदार्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यास ते सज्ज झाले आहेत. केळवे बीचला शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने काही प्रमाणात विकासकामे झाली आहेत.

- Advertisement -

 

केळवे बीच व परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असून समुद्रातील धोकादायक भागात होर्डिंग लावण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनाही सीसीटीव्ही कॅमेरे सक्रीय करण्यासोबत पर्यटकांची माहिती घेणे, मद्यपान करून धिंगाणा करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हच्या दृष्टीने विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत. एकंदरीतच सेलिब्रेशनमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भऊ नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

– विजया गोस्वामी, सहायक पोलीस निरीक्षक, केळवे सागरी पोलीस ठाणे


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -