घर पालघर जन्माचा तपशील नाही,दाखला कुठून आणणार

जन्माचा तपशील नाही,दाखला कुठून आणणार

Subscribe

मात्र, काही ठिकाणी ते पूर्णत: जीर्ण झाले आहेत. तर काही ठिकाणी वाळवीने खाल्ल्याने जन्म दाखला मिळविण्यासाठी येणार्‍या व्यक्तींना रेकॉर्ड उपलब्ध होत नाही.

जव्हार : नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट २०१४ पासून झाली. यापूर्वी हा ठाणे जिल्ह्याचाच भाग होता. दरम्यान त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधार नोंदणी केल्यानुसार आजही तीस टक्के नागरिकांच्या आधार कार्डवर ठाणे जिल्हाचे आहे. त्यामुळे रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करणे कठीण होत आहे.हे असताना, आता आधारमधील जन्म तारखेची नोंद बदलायची झाल्यास जन्म नोंद दाखला मागितला जात आहे. विशेष म्हणजे वृद्ध नागरिकांचे जन्म नोंद तपशील उपलब्ध होत नाही. त्यामुळे जन्म दाखला सादर करता येत नाही,परिणामी आधारमध्ये जन्म नोंद दुरुस्ती करण्याची समस्या वाढली आहे. ग्रामीण भागात जन्म व मृत्यूची नोंदणी ग्रामपंचायतीमध्ये केली जाते. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आजही ३५ ते ४० वर्षांचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. मात्र, काही ठिकाणी ते पूर्णत: जीर्ण झाले आहेत. तर काही ठिकाणी वाळवीने खाल्ल्याने जन्म दाखला मिळविण्यासाठी येणार्‍या व्यक्तींना रेकॉर्ड उपलब्ध होत नाही.

सुवर्ण मध्य निघणे आवश्यक
आधारवरील जन्मतारीख अपडेट करायची असल्यास जन्म दाखला, दहावी, डिप्लोमा, पासपोर्ट हे पर्याय दिले आहेत. यापैकी नसल्यास कोर्टातून जन्म दाखला मिळविण्याचा पर्याय आहे. मात्र, कोर्टातून दाखला मिळविण्यासाठी येथील आदिवासी नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शासनाने या बाबतीत सुवर्णमध्य काढावा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

मी शाळा शिकलोच नाही, निराधार पेन्शन योजने करिता आधार अपडेट करायचे आहे. मात्र, जन्म दाखला आवश्यक केल्याने आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत, पंचायत समिती ठिकाणी रेकॉर्ड उपलब्ध नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जन्म दाखला कुठे शोधू, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देवू खोटरा,वृध्द नागरिक

वृध्द नागरिकांचा जन्म नोंद पुरावा उपलब्ध होत नसल्याचे कानावर आले आहे.त्यामुळे आधार जन्म नोंद दुरुस्तीत समस्या येते आहे.याबाबत सुवर्णमध्य काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

- Advertisement -

– लता धोत्रे,तहसीलदार,जव्हार

- Advertisment -