Eco friendly bappa Competition
घर पालघर जव्हार महाविद्यालयातील अतिरिक्त १७ विद्यार्थ्यांना नो एन्ट्री

जव्हार महाविद्यालयातील अतिरिक्त १७ विद्यार्थ्यांना नो एन्ट्री

Subscribe

मात्र यावर्षी विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला नियोजित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुंबई विद्यापीठाने परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

जव्हार: जव्हार , मोखाडा व विक्रमगड तालुक्याकरिता शिक्षणाची पंढरी म्हणून जव्हारमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय संबोधले जाते.परंतु यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये १७ अतिरिक्त आदिवासी विद्यार्थ्यांचे विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला तात्पुरते घेण्यात आलेले प्रवेश महाविद्यालयाने रद्द केल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. जव्हार महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला मुंबई विद्यापीठाची १२० विद्यार्थी प्रवेश मर्यादा आहे. मात्र जव्हार सहित तीन तालुक्यांचा भार या महाविद्यालयावर असल्याने मर्यादित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशासाठी येत असतात. बर्‍याचदा या महाविद्यालयातील अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून प्रस्ताव देवून मुंबई विद्यापीठाने शिक्षणाची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. मात्र यावर्षी विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाला नियोजित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मुंबई विद्यापीठाने परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

सन २०२३ ते २०२४ मध्ये जव्हार महाविद्यालयाने १७ अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश दिला होता. सुमारे ३ ते ४ आठवडे हे विद्यार्थी महाविद्यालयात दैनंदिन येत होते. परंतु अचानक मुंबई विद्यापीठाने वाढीव विद्यार्थी संख्येला मंजुरी न दिल्याने जव्हार महाविद्यालयाकडून अतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांचे शैक्षणिक कागदपत्र व फी परत देण्यात आले.

- Advertisement -

महाविद्यालयाला जर अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशाबद्दल शाश्वती नव्हती तर, विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी घेणे उचित नव्हते. सुरुवातीलाच प्रवेश नाकारला असता, तर या विद्यार्थ्यांनी अन्य ठिकाणी प्रवेशाकरिता प्रयत्न केले असते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असते.
राजाराम पारधी, पालक

दरवर्षीप्रमाणे अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश क्षमता मंजुरी मिळणे साठी, मुंबई विद्यापीठ येथे प्रस्ताव पाठवण्यात आला होता, परंतु मुंबई विद्यापीठाने अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश परवानगी न दिल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत.
डॉ.एम.आर.मेश्राम, प्रिन्सिपल, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, जव्हार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -