मोखाडा : मला नेहमीच मोखाडा तालुक्याचा अभिमान आहे. कारण सर्वात जास्त आयएसओ शाळा या मोखाडा तालुक्यात झालेल्या आहेत. शिक्षकांची कमी असलेली संख्या आणि शैक्षणिक बाह्य कामे या सगळ्या अडचणीतूनही चांगले काम शिक्षक करतात. यामुळे मुख्यालयी राहायचा माझा आग्रह नाहीच. मात्र माझ्या विद्यार्थ्यांना वाचता- लिहिता यायला हवे तसेच शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे, यासाठी मी नेहमीच आग्रही असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले. तब्बल ३ वर्षांनी आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावर्षी मोखाडा पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडून हा तिन्ही वर्षांचा अनुशेषच एक प्रकारे भरून काढण्यात आला. यावेळी एकूण चार वर्षांच्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, केंद्र प्रमुख आणि इतर चांगले काम केलेल्या तब्बल ३५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात निकम यांनी मोखाडा शिक्षण विभागाची आणि गटशिक्षणाधिकारी वसंत महाले यांची प्रशंसा केली.
यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले आमदार सुनिल भुसारा यांनी शिक्षकांना शुभेच्छा देताना नोकरी या चाकोरीच्या बाहेर जावून आपण येथील विद्यार्थी शिक्षणाने समृद्ध कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सभापती भास्कर थेतले यांनी आदर्श शिक्षकांना शुभेच्छा दिल्या तर उपसभापती प्रदीप वाघ यांनी याभागात काम करणारे सर्वच शिक्षक तसे आदर्श असून हे पुरस्कार म्हणजे तुमच्यातील प्रतिनिधित्व करीत असलेल्या समस्त शिक्षकांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, सारीका निकम,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,पंचायत समिती सदस्य लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील, आशा झुगरे,युवराज गिरंधले गटविकास अधिकारी कुलदीप जाधव आदि अधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोखाडा तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष भरत गारे तसेच ईश्वर पाटील,हेमंत लहामगे,रविकांत पाघारी, रीयाज शेख, नितिन आहेर,देसले व सर्व सहकार्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.तसेच समितीकडून शिक्षण बाह्य काम लादण्याच्या विरोधातील निवेदनही समितीने दिले.
बॉक्स
आदर्श शिक्षक सन्मानाचे मानकरी
अनंता भुसारे, संदीप देवराज ,दत्तू घोडके ,घनश्याम पाटील, दत्तात्रय अनंता इधे,कांचन सोनटक्के, धनंजय नंदन,भरत भोरे,ललित मोरे,जावेद शेख,प्रवीण घुले, संदीप व्यवहारे,रविंद्र विशे, प्रमिला तुसे,अश्विनी पाघारे, दत्ता लव्हाळे,किरण निकम, गोपाळ कव्हा, निलेश तुसे,राजाराम जोशी ,पूनम साबळे,हेमंत पाटील गणेश इंगळे,शांता चौधरी,सुरेश बेलदार,दत्ता उमाटे,संतोष बोन्द्रे,अमोल घोडके,नागो विरकर,मिलिंद चौधरी तर वर्ष निहाय पंढरीनाथ धनाजी जनाठे, दत्तात्रय धोंडिबा जाधव, रमेश निरगुडे ,राजेंद्र दिगंबर जाधव यांना जिल्हा पुरस्कार मिळाले.