घरपालघरनिळमाती येथील विहिरीची तात्काळ दुरुस्ती करण्याची सूचना

निळमाती येथील विहिरीची तात्काळ दुरुस्ती करण्याची सूचना

Subscribe

त्यामुळे निळमाती येथील पाणी समस्या मिटण्याचे चिन्ह आहे.

मोखाडा: मोखाडा तालुक्यातील निळमाती गावच्या पिण्याच्या पाण्याचा विहिरीचा कठडा तुटल्याने गेल्या वर्षभरापासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी आबाळ चालू होती. याची दखल घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या गावातील विहिरीची पाहणी केली. यावेळी सदरची नादुरुस्त विहीर तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना निकम यांनी केल्या. तसेच येथील पाणीपुरवठा योजना पुनर्जिवित करणे आणि नवीन विहीर बांधण्याची कामे हाती घेण्याच्या सूचनाही निकम यांनी उपस्थित पाणी पुरवठा उपअभियंता पाध्ये यांना केल्या आहेत.

त्यामुळे निळमाती येथील पाणी समस्या मिटण्याचे चिन्ह आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, सरपंच निरगुडे आदी ग्रामस्थ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोखाडा तालुक्यात सध्या जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. अशातच अशा अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा आकडा मोठा होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सर्व ग्राम पंचायतींमधील विहिरी, पाणीपुरवठा योजना या पुनर्जीवीत कराव्यात अशी मागणी आता समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -