घर पालघर प्रांत खात्यात परस्पर रक्कम वळण्याप्रकरणी नोटीस

प्रांत खात्यात परस्पर रक्कम वळण्याप्रकरणी नोटीस

Subscribe

यामध्ये मुलगा व पत्नीला अटकपूर्वक जामीन मिळाला असला तरी खात्यात रक्कम कशी जमा झाली व का जमा केली, कोणाच्या सांगण्यातून केली याबाबत उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी पैसे जमा करण्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील गिराळे गावातील प्रयान प्रभाकर पाटील व पत्नी परिता प्रयान पाटील यांनी जन्मदात्या पित्याची फसवणूक केली होती. वडील प्रभाकर नारायण पाटील यांची एक कोटी दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक करून परस्पर बनावट सहीचा वापर करून खात्यातून वळवण्यात आल्याने सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मुलगा व पत्नीला अटकपूर्वक जामीन मिळाला असला तरी खात्यात रक्कम कशी जमा झाली व का जमा केली, कोणाच्या सांगण्यातून केली याबाबत उपविभागीय अधिकारी सुनील माळी यांनी पैसे जमा करण्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई -बडोदा महामार्गावर झालेल्या भूसंपादनात गेलेल्या जमिनीचा सातबारा उतारा स्वतःच्या नावावर नसून दत्तक म्हणून जमीन त्यांच्या ताब्यात होती. सातबारा उतारा घडवण्याच्या आधीच पाटील यांच्या नावे एक करोड रक्कम जमा झाली कशी अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही रक्कम महसूल विभाग व दलालच्या पाठीशी घालून काढले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुलांनी त्याच्या पत्नीच्या खात्यातून एक कोटी दोन लाख साठ हजार ९५१ रुपये प्रांत कार्यालयात वर्ग करण्यात आले होते. याबाबत प्रांत अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे.
सफाळे पोलीस ठाणे यांनी प्रभाकर नारायण पाटील यांच्याकडील गट क्रमांक २८ मधील ६९१० चौ.मी.जमीन मुंबई -वडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेली जमिनीचा मोबदला एक कोटी दोन लाख साठ हजार ९५१ रुपये जमा केले होतो. सदर रक्कम परत खात्यामध्ये जमा झाली आहे. खात्याशी माहिती आपणास कोणाकडून प्राप्त झाली?, सदर रक्कम वरील नमूद खात्यात कोणी जमा करायला सांगितले?, सदर रक्कम आपणास नमूद खात्यात का जमा केली? अशा अनेक मुद्द्यावर प्रांत अधिकारी सुनील माळी यांनी गिराळे येथील प्रयाण प्रभाकर पाटील व परिता प्रयान प्रभाकर पाटील यांना सदर रकमेबाबत खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -