घरपालघरआता मिरा भाईंदरमधील सर्व गाड्यांचे पासिंग शहरातच होणार

आता मिरा भाईंदरमधील सर्व गाड्यांचे पासिंग शहरातच होणार

Subscribe

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी मिरा भाईंदर शहरात आरटीओ उपकेंद्र म्हणजेच वाहनचालक परवाना मिळण्यासाठी शिबीर कार्यालय मिरा रोड येथे सुरु करण्यात आले होते.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षी मिरा भाईंदर शहरात आरटीओ उपकेंद्र म्हणजेच वाहनचालक परवाना मिळण्यासाठी शिबीर कार्यालय मिरा रोड येथे सुरु करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांची सोय झाली. त्यांचा वेळ, पैसा याची बचत झाली. मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वाढती वाहन संख्या व लोकसंख्या विचारात घेता याठिकाणी कायमस्वरूपी वाहनचालक परवाना तसेच मिरा भाईंदर शहरातील वाहनांचे पासिंग शहरातच व्हावे, अशी मागणी विविध संस्था व नागरिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे करत होते. शहरातील नागरिकांच्या मागणीवरून नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मिरा भाईंदरमधील गाड्यांच्या पासिंग संदर्भात आरटीओच्या अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती आमदार सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन विधानभवनामध्ये बैठक झाली होती. त्यात मिरा भाईंदरच्या टेस्टिंग ट्रॅकबद्दल चर्चा करून परिवहन मंत्र्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.

शहरातील वाहनांच्या पासिंगकरता भाईंदर पश्चिमे येथे असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाची जागा परिवहन विभागास मिळू शकते का?, याबाबत प्रस्तावावर विचार करावा व सर्व संबंधितांची बैठक बोलवावी असे, मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते. मात्र जागा उपलब्ध करणे व तेथे कायमस्वरूपी केंद्र करणे यासाठी काही कालावधी लागू शकतो. तोपर्यंतच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात सध्या घोडबंदर जेसल पार्क येथे आरटीओ उपकेंद्र म्हणजेच शिबीर कार्यालय सुरु आहे. त्याच्या समोरील वापरात नसलेल्या रस्त्याची एक बाजू (किमान २५० मी. लांबी) वाहनाच्या फिटनेस तपासणीसाठी महापालिकेने आरटीओला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून येथील नागरिकांना कल्याण (नांदिवली) येथे वाहनांच्या पासिंगसाठी जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे रस्त्यावरची रहदारीही कमी होणार आहे, असे राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना पत्र देऊन कळवले होते. शहरातील वाहनांच्या पासिंगसाठी शहरातच टेस्टिंग ट्रॅकसाठी पालिकेने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती आमदार सरनाईक यांनीही आयुक्तांना केली. त्याची दखल घेऊन महापालिकेने जागा देण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे. त्यानुसार परिवहन मंत्री अनिल परब यांनी विषय निकाली काढला.

- Advertisement -

मंगळवारी आमदार सरनाईक यांनी मिरा भाईंदर प्रादेशिक उपकेंद्राचे उपअधिकारी शेळके यांच्यासह नियोजित जागेची पाहणी केली. ही जागा उपलब्ध झाल्याने तेथे ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’ सुरु होणार आहे. तसेच १ मेपासून शहरात असलेल्या आरटीओ उपकेंद्राच्या माध्यमातून टू व्हिलर, थ्री व्हिलर व फोर व्हिलर गाड्यांच्या पासिंगची सुविधा सुरु होणार असून त्यासाठी येथील नागरिकांना दूरवर जाण्याचा त्रास त्यामुळे वाचणार आहे. तसेच भविष्यात ट्रक व ट्रेलरची देखील पासिंग होऊ शकेल, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली.

हेही वाचा –

राणा प्रकरणात देवेंद्र फडणवीस उघडे पडलेत – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -