घर पालघर आता पाण्याखाली देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स

आता पाण्याखाली देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स

Subscribe

तसेच या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय अधिकारी दिनेश पाटील, पवन काळे आणि मासेमारी समाजाचे नेते लिओ कोलासो , विविध सहकारी मासेमारी संस्थाचे पदाधिकारी व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाईंदर :- पर्यावरणीय व वातावरणीय बदलांमुळे मच्छीमारांना हंगाम सुरू झाल्यानंतरही मच्छीमारांना त्यांच्या जाळ्यात मासे सापडत नाहीत. माश्यांचे प्रजनन व वाढ होत नाही.तसेच गुजरातमधील दिव व कोडीनारसह अन्य भागांत खडक असल्याने त्याठिकाणी जगभरातून मासे तिथल्या खडकात प्रजनन करत असतात. त्यामुळे अरबी समुद्राच्या उत्तन येथे समुद्रामध्ये कृत्रिम खडक ( आर्टिफिशियल रीफ ) तयार करण्याबाबत व त्याची जनजागृती करण्यासाठी रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी मच्छिमारांना मार्गदर्शन करण्यासाठी सीएमएफआरआय चेन्नईचे वैज्ञानिक किझा कुडन हे उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय अधिकारी दिनेश पाटील, पवन काळे आणि मासेमारी समाजाचे नेते लिओ कोलासो , विविध सहकारी मासेमारी संस्थाचे पदाधिकारी व मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर ) चेन्नई येथील समुद्रकिनार्‍यांवर कृत्रिम खडक उभारला आहे. या अनोख्या संकल्पनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक मासेमारी समुदायाला संवेदनशील करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जो किझा कुडन यांनी सागरी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्याच्या क्षमतेबद्दल आणि कृत्रिम खडकांच्या माध्यमातून संसाधने वाढवण्याबद्दल विस्तृतपणे मच्छिमारांना माहिती दिली. मासेमारी समुदायाला कृत्रिम खडक तयार करण्यासाठी जागा ओळखण्यास सांगण्यात आले आहे. ज्यामुळे सागरी तज्ञांच्या मते माशांच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ होऊ शकते. आम्ही त्यावर चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे माजी नगरसेवक व अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी सांगितले आहे. तर चांगल्या व उच्च दर्जाच्या पापलेट आणि इतर मच्छी मिळण्यासाठी खडकांमुळे फायदा सुद्धा होईल.

- Advertisement -

कृत्रिम खडक तयार करण्याची आवश्यकता

माशांच्या एकत्रीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी कृत्रिम खडकाचे अनुकरण करताना सागरी, फुलांचा आणि जीवजंतू (पाण्याच्या तळाशी संबंधित) समुदायांची वाढ होते. कालांतराने, मासेमारीला चालना देण्यासाठी आणि मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी कृत्रिम खडक तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मच्छिमारांची संमती आणि सहकार्य देखील आवश्यक आहे असे डॉ. जो. किझा कुडन यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -