घर पालघर मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक

मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज आक्रमक

Subscribe

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे.

वाडा: मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देवू नयेत, पालघर जिल्ह्यात पेसामुळे ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू करावे तसेच मराठ्यांचा समावेश ओबीसीमध्ये करू नये या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ओबीसी संघर्ष समिती वाडा तालुक्याच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी फास घेऊ दोरीला; आरक्षण गेले चोरीला, पेसा हटाव; ओबीसी बचाव आरक्षण आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे, ओबीसी एकजुटीचा विजय असो,उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो, ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.खंडेश्वरी नाका येथून रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे.

त्यामुळे शासनाने शासन निर्णयाद्वारे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे,असा आरोप करीत आरक्षणाला घेऊन ओबीसी समाज आक्रमक झाला असून शासन निर्णय रद्द करून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया तत्काल रद्द करून करण्यात यावी, तसेच पालघर जिल्ह्यातील पेसा कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी समाज संघर्ष समिती वाडा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात अध्यक्ष विश्वनाथ पाटील, विलास आकरे, योगेश पाटील, सुवर्णा पाटील, निलेश गंधे, निलेश पाटील, युवराज ठाकरे, संदीप पवार, जितेश पाटील, अदनान धांगे, प्रणय जाधव, ऋषिकेश सावंत आदींनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -